T20 World Cup: भारतावर शाहीद आफ्रिदीने केलेत हे गंभीर आरोप

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 04, 2022 | 13:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shahid Afridi: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने टीम इंडियावर मोठे आरोप करताना असे विधान केले की जे खरंच निंदनीय आहे. शाहीद आफ्रिदीने या बाबतीत आयसीसीलाही मध्येच घेतले आहे. 

shahid afridi
T20 World Cup: भारतावर शाहीद आफ्रिदीने केलेत हे गंभीर आरोप 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तान खुद्द टी20 वर्ल्ड कप 2022च्या सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.
  • यामुळेच ते टीम इंडियाच्या चांगल्या कामगिरीवर जळत आहेत.
  • टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप 2022च्या सेमीफायनलमध्ये जागा बनवण्याच्या मार्गावर आहे.

मुंबई: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने(pakistan former captain shahid afridi) टीम इंडियावर(team india) मोठे आरोप करताना असे विधान केले आहे की जे खरंच निंदनीय आहे. शाहीद आफ्रिदीने या प्रकरणात आयसीसीलाही(icc) मध्येच खेचले आहे. शाहीद आफ्रिदीने आरोप केला की आयसीसी भारतीय क्रिकेट संघाला फेव्हर करत आहे आणि त्यांना टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कप 2022च्या(t-20 world cup 2022) सेमीफायनलमध्ये पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहे. shahid afridi take a dig on team india T20 World Cup 2022

अधिक वाचा - एका व्यक्तीला किती वेळा येऊ शकतो हार्ट अटॅक?

भारताबाबत शाहीद आफ्रिदीने केले हे गंभीर आरोप

शाहीद आफ्रिदीने भारत आणि बांगलादेश यांच्यात बुधवारी 2 नोव्हेंबरला खेळवण्यात आलेल्या टी20 वर्ल्ड कप 2022च्या सामन्यात टीम इंडिया आणि आयसीसीच्या वर्तणुकीवर सवाल उपस्थित केले आहेत. शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानी चॅनेल सोबत बोलताना सांगितले, तुम्ही पाहिले की अॅडलेडमध्ये मैदान किती ओले होते. मात्र तसे असतानाही त्याच मैदानावर सामना पुन्हा सुरू करण्यात आला. आयसीसी एक प्रकारने भारतीय क्रिकेट संघाला साथ देत आहे आणि त्यांना काहीही करून टीम इंडियाला सेमीफानयनलमध्ये पोहोचवायचे आहे. 

बांगलादेश सामन्याबाबत बोलताना दिली ही प्रतिक्रिया

शाहीद आफ्रिदीने सांगितले, मला वाटते की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिष टीम इंडियाच्या बाजूनेच आहे आणि अंपायरही तेच होते ज्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात अंपायरिंग केली होती. त्या अंपायर्सना आयसीसीचा बेस्ट अंपायर्सही अवॉर्ड दिला जाईल. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने या विधानात आयसीसीबद्दलचा राग व्यक्त केला आहे. 

अधिक वाचा - टी20 वर्ल्ड कपमध्ये आग ओकतोय हा 23 वर्षांचा गोलंदाज

म्हणून टीम इंडियावर जळतोय शाहीद आफ्रिदी

पाकिस्तान खुद्द टी20 वर्ल्ड कप 2022च्या सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. यामुळेच ते टीम इंडियाच्या चांगल्या कामगिरीवर जळत आहेत. टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप 2022च्या सेमीफायनलमध्ये जागा बनवण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शाहीद आफ्रिदी अशी निरर्थक विधाने करत आहे. गेल्या वर्षी UAE मध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कप 2021मध्ये जेव्हा भारत ग्रुप सामन्यातूनच बाहेर गेला होता तेव्हा शाहीद आफ्रिदीने आयसीसीवर टीम इंडियाची बाजू घेत असल्याचा आरोप केला नव्हता. 

आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव

पाकिस्तानला द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभव सहन करावा लागला. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये एकूण 185 धावा केल्या होत्या. मात्र द. आफ्रिकेला डकवर्थ लुईस नियमानुसार केवळ 108 धावाच करता आल्या. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी