शाहिद आफ्रिदीचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, काश्मीर टीमचं नेतृत्व करण्याची इच्छा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 19, 2020 | 21:17 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Shahid Afridi on Kashmir issue:पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय.आफ्रिदीनं म्हटलं की,त्याच्या अखेरच्या पीएसएलमध्य़े त्याला काश्मीर टीमची जबाबदारी सांभाळायचीय

Shahid Afridi
पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य 

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
  • पुढील वर्षी पीएसएलमध्ये काश्मीर टीमचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा केली व्यक्त.
  • आफ्रिदीनं यापूर्वी पंतप्रधान मोदींबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य.

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांसाठी काश्मीरचा मुद्दा नेहमीच संवेदनशील मुद्दा राहिलाय. स्वातंत्र्यानंतर काश्मीर दोन्ही देशांसाठी भावनेचा विषय झालाय. जिथं अनेक सेलिब्रेटीज या राजकीय मुद्द्यापासून स्वत:ला दूर ठेवतात, तिथं पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी नेहमी या विषयावर काही ना काही वादग्रस्त बोलत असतो.

नुकताच आफ्रिदीनं भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत मोठा वाद ओढवून घेतला, ज्यामुळे भारतीय क्रिकेटपटू पण चिडले. युवराज सिंह, हरभजन सिंह, गौतम गंभीर, सुरेश रैना आणि शिखर धवननं शाहिद आफ्रिदी विरोधात आपला राग व्यक्त केला होता. हरभजन सिंह आणि युवराज सिंहनं तर आफ्रिदी फाऊंडेशनला केलेल्या मदतीचा पश्चाताप होत असल्याचं म्हटलं होतं.

नुकताच पीओकेचा प्रवास करतांना आफ्रिदीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वक्तव्य केलं होतं. याशिवाय त्यानं पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल)च्या आपल्या अखेरच्या वर्षात काश्मीर टीमचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली.

आफ्रिदीनं म्हटलं, ‘मी या संधीचा वापर करत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी)ला विनंती करू इच्छितो की, पुढील वर्षी जेव्हा पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) असेल, तेव्हा काश्मीर नावाच्या नवीन टीमचा त्यात समावेश अवश्य करावा आणि मी त्या काश्मीर टीमचं आपल्या अखेरच्या वर्षी नेतृत्व करू इच्छतो. मी पीसीबीला विनंती करतो की, पुढील फ्रेंचायजी काश्मीर असेल. जर इथं स्टेडियम बनलं तर क्रिकेट अॅकॅडमी उघडेल आणि मी कराचीहून इथं येवून अॅकॅडमी चालविण्यास मदत करण्यास तयार आहे.’

आफ्रिदी पुढे म्हणाला, ‘मी ऐकलंय की, या परिसरात १२५ क्लब सुरू आहेत. तर त्या टीम दरम्यान एक टूर्नामेंट केली जावू शकते. मी इथं येऊन मॅच पाहतांना आनंद व्यक्त करेल. या टूर्नामेंटमधील महत्त्वाच्या खेळाडूंना मी आपल्यासोबत कराचीला घेऊन जाईल. ते माझ्यासोबत राहू शकतात, माझ्या सोबत प्रॅक्टिस करू शकतात आणि आपलं शिक्षणही पूर्ण करू शकतात.’

आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की, टीम इंडियातील खेळाडू आफ्रिदीच्या या काश्मीर मुद्द्याला कशाप्रकारे उत्तर देतील. आफ्रिदीनं अखेरची मॅच पीएसएल २०२०मध्ये मुल्तांस सुल्तांस साठी खेळली होती. पाकिस्ताननं पहिल्यांदा पीएसएलचं होस्टिंग केलं, जे कोरोना व्हायरस महामारीमुळे नॉकआऊट स्टेजपूर्वीच स्थगित केली गेली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी