ढाका: बांगलादेश (Bangladesh)चा ३४ वर्षीय ऑलराऊंडर क्रिकेटर शाकिब अल हसन(Shakib Al Hasan)ला वेगळ्या ओळखीी गरज नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने स्वत:चे असे स्थान निर्माण केले आहे. बांगलादेशचा हा स्टार ऑलराऊंडर सध्या प्रतिष्ठित टी-२० टूर्नामेंट बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये व्यस्त आहे. हसनने फॉर्च्यून बरीशलसाठी खेळताना मिनिस्टर ग्रुप ढाकाविरुद्ध एक खास यश मिळवले होते. shakib al hasan became first cricketer in t-20 format who did this
खरंतर ह स्टार ऑलराऊंडरने ढाकाच्या अनुभवी फलंदाज महमूद्दूल्हा रिादला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवताना टी-२० क्रिकेटमध्ये ४०० विकेट घेण्याचा इतिहास रचला आहे. इतकंच नव्हे तर टी-२० क्रिकेटमध्ये डाव्या हाताचा पहिला गोलंदाज आहे ज्याने ४०० विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. हसन टी-२० प्रकारात जगातील विविध लीगमध्ये खेळतो. त्याने आपल्या संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय प्रकारात आतापर्यंत ९४ सामने खेळताना ९३ डावांमध्ये १९.८च्या सरासरीने ११७ विकेट मिळवल्या आहेत. इतकंच नव्हे तर तो सध्याच्या आयसीसी बेस्ट ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
टी-२० प्रकारात सर्वाधिक विकेट मिळवण्याचा रेकॉर्ड सध्याच्या घडीला वेस्ट इंडिजचा अनुभवी ऑलराऊंडर खेळाडू ड्वायेन ब्रावोच्या नावावर आहे. ब्रावोने जगातील अनेक प्रतिष्ठित टी-२० स्पर्धा खेळताना ५५४ विकेट मिळवल्या आहेत. ब्रावनोच्या नंतर दुसऱ्या स्थानावर स्पिनर इम्रान ताहिरचा नंबर लागतो. ताहिरने टी-२० प्रकारात ४३५ विकेट मिळवल्या आहेत.
या दोन खेळाडूंच्या नंतर तिसऱ्या स्थानावर कॅरेबियन स्पिनर सुनील नरेन आणि चौथ्या स्थानावर अफगाण स्पिनर रशीद खानचे नाव येते. नरेनने आतापर्यंत टी-२० प्रकारात ४२५आणि अफगाणचा स्पिनर रशीद खानने ४२० विकेट मिळवल्या आहेत. यानंतर पाचव्या स्थानावर सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत हसनचे नाव येते.