IND vs BAN: भारत-बांगलादेश सामन्याआधी शाकीबच्या विधानाने मोठी खळबळ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 01, 2022 | 12:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

shakib al hasan: टी20 वर्ल्ड कप 2022मध्ये भारताविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या सामन्याआधी बांगलादेश संघाचा कर्णधार शाकीब अल हसनच्या एका विधानाने साऱ्यांनाच हैराण केले आहे. 

shakib al hasan
भारत-बांगलादेश सामन्याआधी शाकीबच्या विधानाने मोठी खळबळ 
थोडं पण कामाचं
  • टी20 वर्ल्ड कप 2022च्या सुपर 12मध्ये टीम इंडियाने आतापर्यंतच्या 3 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवलेत. त
  • बांगलादेश संघानेही तीन पैकी दोन सामने जिंकलेत.
  • बांगलादेश ग्रुप 2मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

मुंबई: टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022)मध्ये टीम इंडिया आपला चौथा सामना 2 नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघादरम्यान हा सामना अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी बांगलादेश संघाचा कर्णधार शाकीब अल हसनने(shakib al hasan) एक विधान केले आहे ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगताला हैराण केले आहे. Shakib al Hasan statement before India vs Bangladesh match

अधिक वाचा - बहिणीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जापोटी भावाची आत्महत्या

शाकीबचे विचित्र विधान

भारताविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या सामन्याआधी शाकीब अल हसनने म्हटले की, त्यांचा संघ येथे टी20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलेला नाही. टीम इंडिया येथे जिंकण्यासाठी आली आहे. बांगलादेशने जर भारताला हरवले तर हा एक उलटफेर असेल. एकीकडे सर्व संघ या स्पर्धेत जिंकण्यासाठी खेळत असताना शाकीबच्या या विधानाने साऱ्यांनाच हैराण केले आहे. 

सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत

टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) च्या सुपर 12मध्ये टीम इंडियाने आतापर्यंतच्या 3 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवलेत. तर बांगलादेश संघानेही तीन पैकी दोन सामने जिंकलेत. बांगलादेश ग्रुप 2मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. अशातच बांगलादेशचा संघ सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करू शकते. मात्र टीम इंडियाला हरवणे हे बांगलादेशससाठी सोपे असणार नाही. 

टीम इंडियाचे पारडे जड

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 11 सामने खेळवण्यात आले. या सामन्यापैकी 10 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे तर केवळ एका सामन्यात बांगलादेशला विजय मिळवता आला. त्यामुळे हा आकडा पाहता टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे. 

अधिक वाचा - मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी राहुल गेठे यांना धमकी

दिनेश कार्तिकला दुखापत

द. आफ्रिकेच्या 15व्या ओव्हरदरम्यान दिनेश कार्तिकच्या पाठीला त्रास होऊ लागला. या ओव्हरच्या समाप्तीनंतर दिनेश कार्तिक खूपच त्रास सहन करत असल्याचे दिसला. त्याने आपली पाठ पकडली होती.यानंतर फिजिओ मैदानावर आले मात्र कार्तिकच्या पाठीचा त्रास कमी झाला नाही आणि फिजिओसह पॅव्हेलियनमध्यये परतला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी