Shane Warne Accident: शेन वॉर्नचा मोठा अपघात, १५ मीटरपर्यंत घसरली बाईक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 29, 2021 | 14:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

former cricketer shane warne accident: ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्न बाईक अपघातात जखमी झाला आहे. त्याचा अपघात झाला तेव्हा मुलगाही त्याच्यासोबत होता. 

shane warne
शेन वॉर्नचा मोठा अपघात, १५ मीटरपर्यंत घसरली बाईक 
थोडं पण कामाचं
  • सिडनी मॉर्निंग हेराल्डनुसार, शेन वॉर्नचा मुलगा जॅक्सनसोबत बाईकवर राईड करत होता.
  • जेव्हा तो पडला तेव्हा तो १५ मीटरपेक्षा अधिक घसरत गेला.
  • या महान स्पिनरला गंभीर दुखापत झालेली नाही

सिडनी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्न(australia former cricketer shane warne) बाईक अपघातात(bike accident) जखमी झाला आहे. तो आपला मुलगा जॅक्सनसोबत मेलबर्नमध्ये ३०० किलोच्या बाईकवर राईड(bike ride) करत होता. या महान स्पिनरला गंभीर दुखापत झालेली नाही. त्याला कुल्ला, गुडघा आणि टाचेला दुखापत झाली आहे. दरम्यान, त्याच्या मुलाच्या जखमेबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. 

सिडनी मॉर्निंग हेराल्डनुसार, शेन वॉर्नचा मुलगा जॅक्सनसोबत बाईकवर राईड करत होता. जेव्हा तो पडला तेव्हा तो १५ मीटरपेक्षा अधिक घसरत गेला. अपघातानंतर वॉर्न म्हणाला, मला थोडीशी दुखापत झाली असून मी खूप दु:खी आहे. वॉर्नला गंभीर दुखापत झाली नाही मात्र अपघाताच्या दुसऱ्या दिवशी मुका मार लागल्याने त्याला खूप त्रास होत होता. 

५२ वर्षीय क्रिकेटरला ही भीती होती की त्याचा पाय मोडला की काय मात्र असे काही घडले नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी स्पिनरला आजही आगामी अॅशेस मालिकेसाठी कॉमेंट्री करण्याची आशा आहे. ८ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात गाबामध्ये सुरू होत आहे. 

वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक सामने खेळलेआहेत. त्याला जगातील सर्वोत्तम स्पिनर म्हटले जाते. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ७०८ विकेट आहेत. तर आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये त्याने २९३ विकेट घेतल्या आहेत. 

शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया):
मॅच - १४५
विकेट्स - ७०८
एका इनिंगमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन - ८/७१ 

शेन वॉर्नच्या सिक्रेट मैत्रीचे खुलासे 

शेन लीने शेन वॉर्न आणि त्याची मैत्री बनवण्याच्या विचित्र सवयींबद्दल सांगितले. न्यूज डॉट कॉम एयूने लीच्या हवाल्याने लिहिले की, वॉर्नने मला सांगितले की आपल्या दोघांची मैत्री शेन शो असेल. मी आणि तु शेन शो. जेव्हा हे स्टीव्ह वॉ ने पाहिले तेव्हा तो मला किनारी घेऊन गेला होता आणि मला समजावले होते. याबाबत शेन ली म्हणाला, वॉ ने मला बाजूला घेतले आणि विचारले की वॉर्नसोबत तुम्ही मैत्री कशी आहे? मी वॉला सांगितले की तो माझ्याशी चांगला वागतो. त्यानंतर वॉ म्हणाला, तुला लक्षात आहे का शाळेत एक मुलगा असतो त्याचे कोणी मित्र नसतात आणि जेव्हा एखादा नवा मुलगा शाळेत येतो तेव्हा तो त्याच्याशी मैत्री करतो. शेन ली तु तो नवा मुलगा आहे आणि वॉर्न तो मुलगा आहे ज्याचे कोणी मित्र नाहीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी