IND vs SA: Shardulच्या वादळासमोर आफ्रिका फेल, एका स्पेलमध्ये पलटली बाजी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 04, 2022 | 17:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

द. आफ्रिका एक बाद ८८ धावा करत मजबूत स्थितीत दिसत होती. लंचआधी काही वेळ आधी लोकेश राहुलने शार्दूलच्या हाती बॉल दिला आणि हे पाऊल यशस्वी ठरले. शार्दूल ठाकूरने बाजी पलटली. 

team india
IND vs SA: Shardulच्या वादळासमोर आफ्रिका फेल 
थोडं पण कामाचं
  • भारत-द. आफ्रिका दुसरी कसोटी सुरू
  • शार्दूल ठाकूरने बॉलने केली कमाल

जोहान्सबर्ग: भारत आणि द. आफ्रिका(india vs south africa second test) यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जात आहे. पहिल्या डावात भारतीय संघ २०२ धावांवर बाद झाला होता. यानंतर द. आफ्रिकेने दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत १०२ धावांमध्ये चार विकेट गमावल्या होत्या. या चारपैकी तीन विकेट या शार्दूल ठाकूरने(shardul thakur) घेतल्या. एकावेळेस एक बाद ८८ अशी दक्षिण आफ्रिकेची स्थिती होती. लंचच्या काही वेळ आधी लोकेश राहुलने शार्दूल ठाकूरच्या हाती बॉल सोपवला आणि त्याची ही खेळी यशस्वी ठरली. शार्दूलने कमाल केली. शार्दूलने सगळ्यात आधी कर्णधार डीन एल्गरला बाद केले. यामुळे अर्धशतकीय भागीदारी संपली. एल्गर २८ धावा करून ऋषभ पंतच्या हाती कॅच देत बाद झाला. shardul Thakur dismissed 3 batsman of south Africa before lunch

यानंतर शार्दूलने कीगन पीटरसनला आपले शिकार बनवले. पीटरसनची  बाहेर जात असलेल्या लेंथ बॉलवर बॅटचा किनारा लावून बसला यानंतर दुसऱ्या स्लिपवर उभ्या असलेल्या मयांक अग्रवालने शानदार कॅच घेतला. पीटरसन ६२ धावा करून बाद झाला. लंचच्या आधी शेवटच्या बॉलवर आर वेनडर डुसेनही शार्दूलचा शिकार ठरला. डुसेनने बॉलला डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला मात्र बॉलचा किनारा लागून तो विकेटकीपर ऋषभ पंतच्या हाती गेला. डुसेनला केवळ एक धाव करता आली. 

दुसऱ्या कसोटीच्या आधी अनेक जण शार्दूल ठाकूरऐवजी उमेश यादवला प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील करण्यासाठी म्हणत होत्. मात्र निवड समितीने शार्दूलला आणखी एक संधी दिली कारण हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाशिवाय शार्दूल ठाकूर एकमेव असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे फलंदाजीची चांगली समज आहे. आता शार्दूलने पुन्हा एकदा कामगिरीने सिद्ध केले आहे की तो संघासाठी किती महत्त्वाचा खेळाडू आहे.

 

पार्टनरशिप ब्रेकर अशी आहे ओळख

शार्दूल ठाकूरने २०१८मध्ये पदार्पण केले होते. मात्र गेल्या वर्षी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर तो चर्चेत आला होता. शार्दूल पार्टनरशिप तोडण्यात एक्सपर्ट मानला जातो. विकेट घेण्यासोबतच तो खालच्या क्रमांकावर येऊन चांगली खेळीही करतो. २०२१च्या सुरूवातीला शार्दूलने गाबा कसोटीत ६७ धावांची शानदार खेळी केली होती. यामुळे खेळाचे चित्रच पालटले. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतही त्याने शानदार बॅटिंग केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी