Shardul thakur : शार्दुल ठाकूरने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे वधू

Shardul thakur : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आता नव्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. नुकताच त्याचा साखरपुडा झाला आहे. मुंबईच्या या क्रिकेटपटूने 29 नोव्हेंबर रोजी आपल्या दीर्घकाळाच्या मैत्रिणीसोबत लग्न केले.कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मुंबईत पार पडला.

Shardul Thakur got engaged  with his girlfriend
शार्दूल ठाकूरची नवी इनिंग, गर्लफ्रेंडसोबत झाला साखरपुडा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शार्दूल ठाकूरची नवी इनिंग, गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा
  • मुंबईत झाला शार्दूलचा साखरपुडा
  • पुढल्या वर्षी लग्नबंधनात अडकण्याची शक्यता

Shardul thakur : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आता नव्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. नुकताच त्याचा साखरपुडा झाला आहे. मुंबईच्या या क्रिकेटपटूने 29 नोव्हेंबर रोजी आपल्या दीर्घकाळाच्या मैत्रिणीसोबत लग्न केले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मुंबईत पार पडला.


जवळचे लोक उपस्थित होते

India pacer Shardul Thakur gets engaged | Off the field News - Times of  India

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकरसोबत मुंबईत साखरपुडा केला. दोघांच्या साखपुड्याचा फोटो आणि व्हिडिओ काही क्षणात व्हायरल झाला. भारतीय क्रिकेटपटूने बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स इथे फक्त त्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. मात्र, भारतीय क्रिकेटपटूंपैकी कोणी शार्दूलच्या साखरपुड्याला उपस्थित होते की नाही हे स्पष्ट झाले नाही.

टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा भाग असलेल्या शार्दुल ठाकूरला बीसीसीआयने सध्या विश्रांती दिली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये जबरदस्त फटकेबाजी करणारा शार्दुल काही वर्षांपासून टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटचा भाग आहे. 30 वर्षीय शार्दुल ठाकूरने आता टीम इंडियासाठी चार कसोटी, 15 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. T20 विश्वचषकापूर्वी, तो IPL 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला, त्याने संघासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या आणि CSK ला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.


टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य झाला आहे

Shardul Thakur Engagement | Indian cricketer Shardul Thakur got engaged  with girlfriend Mithali, photo-Video | Navabharat - navabharatnews

अलीकडच्या काळात शार्दुल टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये सतत खेळत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात कसोटीत त्याने कठीण परिस्थितीत अर्धशतके झळकावून अनेकांची प्रशंसा केली. शार्दुलची 2017 मध्ये टीम इंडियात एन्ट्री झाली होती. शार्दुलने कसोटीत 14, एकदिवसीय सामन्यात 22 आणि टी-20मध्ये 31 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर शालेय जीवनात त्याने क्रिकेटच्या मैदानावर सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा पराक्रमही केला आहे.  मुंबईच्या उपनगरी भागातील पालघरमध्ये राहणारा शार्दुल ठाकूर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपनंतर लग्न करू शकतो.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी