ऑस्ट्रेलियाविरोधातील हिरो इंग्लंड मालिकेसाठी टीम इंडियातून बाहेर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Feb 17, 2021 | 18:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

मोहम्मद शमी, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, नवदीप सैन सारखे खेळाडू अद्याप संघात परतलेले नाही. त्यांना ऑस्ट्रेलिय दौऱ्यात दुखापत झाली होती. 

टीम इंडिया
ऑस्ट्रेलियाविरोधातील हिरो इंग्लंड मालिकेसाठी टीममधून बाहेर 

थोडं पण कामाचं

  • ठाकूर ऑस्ट्रेलियाविरोधात ब्रिस्बेन कसोटीत खेळला होता.
  • पहिल्या दोन टेस्टमध्ये जे खेळाडू होते तेच खेळाडू पुढील दोन कसोटींसाठी कायम करण्यात आले आहेत. 
  • शार्दूलला इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटीसाठी संघातून बाहेर ठेवण्याचा निर्णय आश्चर्यजनक मानला जात आहे

मुंबई: अहमदाबादमध्ये(ahmedabad) इंग्लंडविरोधातील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी(test matches) भारतीय संघातून(indian team) शार्दूल ठाकूरला(shardul thakur) बाहेर करण्यात आले आहे. बीसीसीआयने माहिती दिली की, उमेश यादव शेवटच्या दोन कसोटीसाठी टीम इंडियात सामील होईल. दरम्यान, याआधी त्याच्या फिटनेसची चाचणी होईल. यात तो पास झाल्यास संघात सामील होईल. यात एक बदलाशिवाय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहिल्या दोन टेस्टमध्ये जे खेळाडू होते तेच खेळाडू पुढील दोन कसोटींसाठी कायम करण्यात आले आहेत. 

मोहम्मद शमी, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा,नवदीप सैनीसारखे खेळाडू अद्याप परतलेले नाहीत. त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापत झाली होती. शार्दूल ठाकूराला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय आश्चर्यजनक होता. 

ठाकूर ऑस्ट्रेलियाविरोधात ब्रिस्बेन कसोटीत खेळला होता. त्याने या कसोटीत अर्धशतक ठोकले होते.तसेच सामन्यात सात विकेट घेतल्या होत्या. भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने कसोटीतील पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदरसह मिळून महत्त्वाची भागीदारी केली होती. याआधी २०१८मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करताना शार्दूल आपल्या दुसऱ्या ओव्हरमधील चौथाच बॉल टाकू शकला होता. त्याच्या मांसपेशी खेचल्या गेल्याने त्याला त्रास होत होता.त्यामुळे त्याने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पदार्पणाच्या सामन्यात त्याला केवळ दहाच बॉल टाकता आले होते. 

टेस्टमध्ये टीम इंडियातून शार्दूल का बाहेर

शार्दूलला इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटीसाठी संघातून बाहेर ठेवण्याचा निर्णय आश्चर्यजनक मानला जात आहे. टीम इंडियाकडे जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्या रूपाने तीन वेगवान गोलंदाज आहेत.तिसऱ्या कसोटीत हे तीनही खेळाडू खेळणार आहेत. ही डे-नाईट टेस्ट असणार आहे. शार्दूलला विजय हजारे ट्रॉफीसाठी मोकळे करण्यात आले आहे. 

असे संकेत मिळत आहेत की इंग्लंडविरोधातील टी-२० आणि वनडे मालिकेसाठी तो टीम इंडियामध्ये सहभागी होऊ शकतो. मात्र हे जाणून घेणेही गरजेचे आहे की इग्लंडविरुद्धचे पाच टी-२०सामने अहमदाबादमध्येच खेळवले जाणारआहेत. आता जर शार्दूल या मालिकेत खेळल्या तर त्याच्यासाठी अहमदाबादमध्येच थांबणे हा चांगला निर्णय असता. 

शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-२० मालिकेत खेळला होता. दोन सामन्यांत त्याने दोन विकेट घेतल्या होत्या. यासोबतच टी-२०मध्ये त्याने नाबाद १७ धावा केल्या होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी