Shardul Thakurने सांगितले त्याच्या यशाचे रहस्य, विकेट काढण्यात येथून मिळाली मदत

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 05, 2022 | 16:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs SA 2nd Test:शार्दूल ठाकूरने जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आफ्रिकेच्या ७ फलंदाजांना माघारी धाडले. 

shardul thakur
Shardul Thakurने सांगितले त्याच्या यशाचे रहस्य 
थोडं पण कामाचं
  • शार्दूलने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी द. आफ्रिकेच्या पहिल्या डावात ६१ धावा देत ७ विकेट मिळवल्या.
  • त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे आफ्रिकेचा संघ मोठी आघाडी घेऊ शकला नाही
  • त्यांचा संघ २२९ धावांवर ऑलआऊट झाला आहे

जोहान्सबर्ग:  जोहान्सबर्ग टेस्ट (Johannesburg test)कसोटीत टीम इंडियाचे पुनरागमन करणाऱ्या शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) आपल्या यशाचे रहस्य सांगितले आहे. त्याने सांगितले की तो पूर्ण वेळ एका खास जागेवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो कारण त्या जागेवर टप्पा खाल्ल्यानंतर बॉल खाली राहताना उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी समस्या बनत होती. shardul thakur told about his success in second test match

शार्दूलने सांगितले, मी जेव्हा गोलंदाजी सुरूू केली तेव्हा समजले की २२ यार्डची विकेट एका जागी बॉल टप्पा खाल्ल्यानंतर सरळ फलंदाजांच्या उर येत होती. येथून बॉल खाली येत होता त्यामुळे मी पूर्ण वेळ त्याच जागेवर गोलंदाजी करणे आणि त्या क्रेकवर गोलंदाजीचा टप्पा खेळवण्याचा प्रयत्न करत होतो. 

शार्दूलने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी द. आफ्रिकेच्या पहिल्या डावात ६१ धावा देत ७ विकेट मिळवल्या. त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे आफ्रिकेचा संघ मोठी आघाडी घेऊ शकला नाही. त्यांचा संघ २२९ धावांवर ऑलआऊट झाला आहे. सामन्यानंतर शार्दूल म्हणाला, सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग दोन्ही जागांवर आम्ही पाहिले की पिचवर वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळाली आहे. फक्त आम्हाला पिचवरची चांगली जागा शोधायची आहे आणि तेथे गोलंदाजी करत राहिली पाहिजे. ते मी केले. 

द. आफ्रिकेचा डाव २२९ धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून शार्दूल ठाकूरने जबरदस्त फलंदाजी करताना ७ विकेट घेतल्या. मोहम्मद शमीच्या खात्यात २ आणि जसप्रीत बुमराहच्या खात्यात १ विकेट आला. द. आफ्रिकेला पहिल्या डावाच्या आधारावर २७ धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात २ बाद ८५  धावा केल्या होत्या.

तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया १-० ने आघाडीवर आहे. सेंच्युरियनमध्ये खेळवल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेला ११३ धावांनी हरवले होते. टीम इंडियाकडे द. आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. तर जोहान्सबर्गमध्येही टीम इंडियाचा रेकॉर्ड शानदार राहिला आहे. येथे आतापर्यंत एकही कसोटी सामना हरलेला नाही. टीम इंडियाने जर जोहान्सबर्गमध्ये कसोटी जिंकली तर मालिकेत ते २-० अशी विजयी आघाडी घेतील

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी