shikhar dhawan: बायकोला मनवण्यासाठी शिखर धवनचा मुलासोबत डान्स, पाहा video

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 15, 2020 | 11:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

shikhar dhawan dance with son: आपल्या बायकोला मनवण्यासाठी भारताचा गब्बर क्रिकेटर शिखर धवनने मुलासोबत डान्स केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

shikhar dhawan
बायकोला मनवण्यासाठी शिखर धवनचा मुलासोबत डान्स, पाहा video 

थोडं पण कामाचं

  • शिखर धवन सोशल मीडियावर असतो अॅक्टिव्ह
  • शिखर आपल्या मुलासोबत करतोय डान्स
  • पत्नीची समजूत घालण्यासाठी शिखरचा प्रयत्न

मुंबई: कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटच्या खेळाला ब्रेक लागला आहे. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून भारताचे क्रिकेटरही आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. भारताचा गब्बर क्रिकेटर शिखर धवनही आपल्या घरच्यांसोबत वेळ घालवत आहेत. शिखर धवनने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे यात तो आपला मुलगा जोरावर सोबत डान्स करताना दिसत आहे. शिखरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

शिखर-जोरावरचा डान्स 

सलामीवीर शिखर धवनने इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत तो आपला मुलगा झोरावरसोबत हिट पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये धवन आपला मुलगा मुलगा झोरावरच्या मदतीने आपली पत्नी आयेशाची समजूत काढताना दिसत आहे. डान्ससाठी तिला मनवताना दिसत आहेत. पती-मुलाच्या या प्रयत्नांकडे पत्नी आयेशा अजिबात लक्ष देत नाहीये आणि ती सोफ्यावर बसली आहे आणि दोघांकडे अजिबात लक्ष देत नाही. 

धवनचे गब्बरज्ञान

धवनने कॅप्शनमध्ये लिहिले, बायकोला मनवण्यासाठी मुलाचा सपोर्ट गरजेचा आहे, आजा नचले आयशा. यात त्याने आपली पत्नी आयेशाला टॅग केले आहे आणि हॅश टॅहगमध्ये लिहिले की गब्बरज्ञान #GabbarGyaan

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Biwi ko manaane ke liye bete ki support lena bhi bada zaroori hai ... Aaja nachle @aesha.dhawan5 # Gabbargyaan

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

चहलने केली कमेंट

भारताचा स्पिनर युझवेंद्र चहलने या व्हिडिओची मजा घेत म्हटले, जेव्हा भाभी धुवेल तेव्हा जोरू बेबी त्यांच्या बाजूने असेल.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो धवन

शिखर धवन नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. तो अनेकदा आपले व्हिडिओ सोशल मीडिावर शेअर करत असतो. सध्या सगळेच क्रिकेटर लॉकडाऊनमुळे घरात आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कधी सुरूवात होईल याचीच क्रिकेटर वाट पाहत आहेत. कोरोनामध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला एकीकडे सुरूवात झाली आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. यातील पहिला कसोटी सामना इंग्लंडने जिंकला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी