VIRAL VIDEO: सुंदरने केली शिखर धवनची मालिश, पाहा मस्तीचा व्हिडिओ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 30, 2022 | 19:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

या दरम्यान दोन्ही खेळाडू साऊथ इंडियन डायलॉग मारताना दिसत आहे. धवनने हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्राम पोस्टसह शेअर केला आहे. यात लिहिले, साऊथमध्ये राहून साऊथ डायलॉग तर बनतोच. 

washington sundar and shikhar dhawan
VIDEO: सुंदरने केली शिखर धवनची मालिश, पाहा मस्तीचा व्हिडिओ 
थोडं पण कामाचं
  • शिखर धवन आणि युवा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर यांचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
  • या व्हिडिओत दोन्ही खेळाडू मस्ती करताना दिसत आहेत.
  • सुंदर मालिश करत आहे आणि धवन त्या मालिशची मजा घेत आहे. 

मुंबई: टीम इंडियाचे(team india) दोन धुरंधर क्रिकेटर शिखर धवन(shikhar dhawan)  आणि युवा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर(washington sundar) यांचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत(video) दोन्ही खेळाडू मस्ती करताना दिसत आहेत. सुंदर मालिश करत आहे आणि धवन त्या मालिशची मजा घेत आहे. shikhar dhawan and washington sundar video on instagram

अधिक वाचा - घरबसल्या WhatsApp वरून डाउनलोड करा तुमचे आधार आणि पॅन कार्ड

साऊथ इंडियाचे डायलॉग खूप चर्चेत असतात आणि शिखर धवनही त्याचा चाहता आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या ताज्या व्हिडिओमध्ये भारताचा अनुभवी ओपनर शिखर धवन खाली बसलेला दिसत आहे आणि वर बसून युवा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर त्याच्या डोक्याची मालिश करताना दिसत आहे. 

या दरम्यान दोन्ही खेळाडू साऊथ इंडियन डायलॉग मारताना दिसत आहे. धवनने हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्राम पोस्टसह शेअर केला आहे. यात लिहिले, साऊथमध्ये राहून साऊथ डायलॉग तर बनतोच. 

शिखर धवन आणि वॉशिंग्टन सुंदरने पोस्ट केलेल्या या मजेदार मालिशच्या व्हिडिओवर हसतानाचा इमोजी बनवला आहे. भारताचा दिग्गज विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

भारतीय संघाची द. आफ्रिकेविरुदध मालिका

भारतीय संघ सध्या द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत व्यस्त आहे. तीन सामन्यांची ही टी-20 मालिका आहे. यातील एक सामना झाला असून त्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दोन सामने उरले आहेत. 

धवन, सुंदर आफ्रिका मालिकेत नाहीत.

दरम्यान, शिखर धवन आणि वॉशिंग्टन सुंदर हे द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नाहीत. 

अधिक वाचा - हिप्सला योग्य आकार देण्यासाठी घरीच करा हे 4 व्यायाम

द. आफ्रिका मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी