VIDEO: वर्ल्डकपमधून बाहेर झाल्याने भावूक झाला शिखर धवन, पोस्ट केला हा व्हिडिओ

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 19, 2019 | 21:57 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर आणि गब्बर नावाने प्रसिद्ध शिखर धवन वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. या निर्णयानंतर त्याने एक व्हिडिओतून भावूक मेसेज दिला आहे.

shikhar dhawan
शिखर धवन 

मुंबई: मँचेस्टमध्ये असलेला भारताटा दुखापतग्रस्त क्रिकेटर शिखर धवन आता भारतात परतत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. मात्र तो तीन आठवड्यानंतर परतेल असे सांगितले जात होते. मात्र आता या चर्चांदरम्यान रिषभ पंतला भारत-पाकिस्तान सामन्याआधी इंग्लंडला बोलवण्यात आले. दरम्यान, त्याला संघात सामील करण्यात आले नाही. यानंतर काही दिवस शिखर धवनला निगराणीखाली ठेवण्यात आले. अखेर बुधवारी ही घोषणा झाली की धवन वर्ल्डकपमधील पुढचे सामने खेळू शकणार नाही आणि त्याच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान दिले जाईल. 

या निर्णयानंतर शिखरने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ट्विटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओत शिखर एकदम भावूक झाला आहे. तो म्हणाला, मी हा व्हिडिओ बनवून तुमच्या सगळ्यांचे आभार मानू इच्छितो. तुम्ही दिलेले प्रेम आणि शुभेच्छांचे आभार. दुर्देवाने माझा अंगठा दुखापतीतून लवकर बरा होऊ शकत नाही. मला वर्ल्डकपमध्ये खेळायचे होते तसेच देशाचे प्रतिनिधित्व करायचे होतेय मात्र आता वेळ आली आहे मला मायदेशी परतावे लागेल आणि या दुखापतीतून सावरावे लागेल. यामुळे मी पुढील सिलेक्शनसाठी स्वत:ला तयार करू शकतो. मला पूर्ण विश्वास आहे की आमचे खेळाडू चांगली कामगिरी करत राहतील. आमच्यासाठी प्रार्थना करत राहा आणि असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद सगळ्यांचे, स्वत:ची काळजी घ्या.

शिखर धवन आता भारतात परतणार आहे. बीसीसीआयने आयसीसीला रिषभ पंतला संघात स्थान देण्याची विनंती केली आहे. लवकरच पंत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. आता हे पहावे लागेल की विराट कोहली पुन्हा विजय शंकरला संधी देणार की रिषभ पंतला संघात घेणार. 

शिखर धवनला ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन कॉल्टर नाईलच्या चेंडूवर दुखापत झाली होती. त्याचा अंगठा दुखावला गेला होता. मात्र दुखापतीनंतरही त्याने या सामन्यात जबरदस्त खेळी केली होती. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध  १०९ चेंडूत ११७ तडाखेबंद खेळी साकारली होती. दुखापतीमुळे या सामन्यात तो फिल्डिंग कऱण्यासाठी आला नव्हता. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धचा भारताचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शिखरला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: वर्ल्डकपमधून बाहेर झाल्याने भावूक झाला शिखर धवन, पोस्ट केला हा व्हिडिओ Description: भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर आणि गब्बर नावाने प्रसिद्ध शिखर धवन वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. या निर्णयानंतर त्याने एक व्हिडिओतून भावूक मेसेज दिला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola