Shikhar Dhawan ला मिळाली 'लव्ह बाईट', चाहत्यांना विचारले....

IND vs ZIM Series: टीम इंडियाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. यासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Shikhar Dhawan Gets 'Love Bite', Asks Fans...
Shikhar Dhawan ला मिळाली 'लव्ह बाईट', चाहत्यांना विचारले....  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • झिम्बाब्वेच्या मालिकेत भारताची दणदणीत सुरुवात
  • शिखर धवनच्या डाव्या हाताला दुखापत झाली.
  • चेंडूमुळे मनगटावर सूज आली होती.

shikhar dhawan : भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे आणि त्यांची सुरुवात मोठ्या विजयाने केली आहे. टीम इंडियाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिला एकदिवसीय सामना गुरुवारी (18 ऑगस्ट) हरारे येथे खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना 10 विकेटने जिंकला. (Shikhar Dhawan Gets 'Love Bite', Asks Fans...)

अधिक वाचा : virat kohli: विराट कोहलीच्या नावासोबत का ट्रेंड होतेय 1000 Days? घ्या जाणून

या विजयाचा नायक सलामीवीर शिखर धवनही ठरला, त्याने नाबाद 81 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान धवनला एक 'लव्ह बाइट' देखील मिळाला, ज्याचा उल्लेख त्याने इंस्टाग्रामवर केला आहे. यासोबतच हा 'लव्ह बाईट' आणखी कोणाला हवा आहे, असा सवालही त्याने चाहत्यांना केला.

अधिक वाचा : Indian Cricket: रिटायरमेंटनंतर ४ वर्षांनी मैदानावर परतणार हा खेळाडू, भारताला जिंकून दिलेत २ वर्ल्डकप

वास्तविक, असे घडले की सामन्यात १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघासाठी शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी सलामी दिली. दोघांनी क्रीझवर जम अशा रीतीने बसवला की इतर कोणत्याही फलंदाजाला येण्याची संधी दिली नाही. या खेळीदरम्यान एक वेगवान चेंडू शिखर धवनच्या मनगटावर आदळला. त्यामुळे त्यांच्या मनगटावर सूज आली होती. धवनने या सूजला लव्ह बाईट म्हटले आहे.

धवनने इंस्टाग्राम स्टोरीवर या सूजेचा फोटो शेअर करत चाहत्यांना विचारले की, 'असा बॉल लव्ह बाइट कोणाला हवा आहे.' धवनच्या डाव्या हाताच्या मनगटावर ही दुखापत झाली आहे. तो डाव्या हाताचा फलंदाजही आहे. त्याच्या या फोटोमध्ये धवन हसत हसत चाहत्यांना लव्ह बाईटबद्दल विचारताना दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी