शिखर धवनला पंतप्रधान मोदींनी दिला मानसिक आधार

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 20, 2019 | 20:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९मधून दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या भारताचा सलामीवीर शिखर धवनला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानसिक आधार दिला आहे.

shikhar dhawan and pm modi
शिखर धवन आणि पंतप्रधान मोदी 

मुंबई: भारताचा सलामीवीर शिखर धवन आयसीसी वर्ल्डकप २०१९मधून बाहेर झाला आहे. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे शिखर वर्ल्डकपमधील पुढचे सामने खेळू शकणार नाहीये. त्यामुळे तो आता मायदेशी परतणार आहे. वर्ल्कपमध्ये खेळू शकणार नसल्याचे शिखरला खूप वाईट वाटतेय. याबाबत त्याने व्हिडिओतून आपले दु:खही व्यक्त केले. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिखर धवनला आधार दिला आहे. 

धवनने शेअर केलेल्या व्हिडिओला रिप्लाय देताना पंतप्रधान मोदींनी त्याला मानसिक आधार दिला. मोदींनी ट्विटरवर म्हटले, डिअर धवन, यात काहीच शंका नाही की क्रिकेटचे मैदान तुला मिस करत असेल. मला विश्वास आहे की तु लवकरच फिट होऊन मैदानावर परतशील आणि देशासाठी अनेक विजय मिळवून देशील. अशा शब्दात मोदींनी धवनला आधार दिला. 

धवनने वर्ल्डकपमध्ये खेळता येणार नसल्याने एक भावूक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यात धवन म्हणाला, मी या व्हिडीओद्वारे तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही मला दिलेल्या प्रेम आणि शुभेच्छांचे खूप आभार. दुर्देवाने माझा अंगठा दुखापतीतून लवकर बरा होऊ शकत नाही. मला वर्ल्डकपमध्ये खेळायचे होते तसेच देशाचे प्रतिनिधित्व करायचे होतेय मात्र आता वेळ आली आहे मला मायदेशी परतावे लागेल आणि या दुखापतीतून सावरावे लागेल. यामुळे मी पुढील सिलेक्शनसाठी स्वत:ला तयार करू शकतो. मला पूर्ण विश्वास आहे की आमचे खेळाडू चांगली कामगिरी करत राहतील. आमच्यासाठी प्रार्थना करत राहा आणि असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद सगळ्यांचे, स्वत:ची काळजी घ्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळताना धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कॉल्टर नाईलच्या चेंडूवर शिखर धवनचा अंगठा दुखावला गेला होता. या दुखापतीनंतरही धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११७ धावांची जबरदस्त खेळी केली होती. मात्र त्यानंतर तो या सामन्यात फिल्डिंगला उतरला नव्हता. सुरूवातीला त्याची दुखापत दोन ते तीन आठवड्यात बरी होईल असे सांगितले जात होते. त्याच्या अंगठ्यामध्ये हेअरलाईन फ्रॅक्चर आढळले.  मात्र ही दुखापत लवकर बरी होणार नसल्याने त्याने या वर्ल्डकपमधून माघार घेतली. तो या वर्ल्डकपमधील केवळ दोनच सामने खेळू शकला. पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि दुखापतीमुळे त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले. 

शिखर धवनच्या जागी आता भारतीय संघात रिषभ पंतला स्थान देण्यात आले आहे. आता वर्ल्डकपच्या उर्वरित सामन्यांमध्ये रिषभ पंतला संधी मिळू शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
शिखर धवनला पंतप्रधान मोदींनी दिला मानसिक आधार Description: आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९मधून दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या भारताचा सलामीवीर शिखर धवनला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानसिक आधार दिला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola