Big Breaking जखमी शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 11, 2019 | 14:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shikhar Dhawan, India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या रविवारी खेळण्यात आलेल्या वर्ल्ड कप २०१९ च्या सर्वात मोठ्या सामन्यात शतक झळकाविणारा शिखर धवन वर्ल्ड कपमधून ३ आठवड्यांसाठी बाहेर झाला आहे. 

shikhar dhawan
शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर 

लंडन : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ मध्ये रविवारी खेळविण्यात आलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया महासामन्यात शिखर धवनने आपल्या करिअरमध्ये १७ वे शतक झळकावले आणि भारताच्या विजयाचा पाया रचला आणि कोट्यवधी चाहत्यांचा रविवार कारणी लावला. त्याच्या दमदार खेळीमुळे भारतीय संघाने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. पण या विजयाचा शिल्पकार शिखर धवन याबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिखर धवनला फलंदाजी करताना अंगठ्याला दुखापत झाली. त्याचा अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तो वर्ल्ड कपच्या आगामी सामन्यात तीन आठवड्यांसाठी खेळणार  नसल्याचे माहिती समोर येत आहे.  ऑस्ट्रेलिया विरूद्धच्यासामन्यात भारत गोलंदाजी करत असताना तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उपस्थित नव्हता. 

शिखर धवन याला नाथन कुल्टन नाइल यांच्या चेंडूवर डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला त्वरित उपचार देण्यात आले. फिजिओ पॅट्रिक फरहार्ट  यांनी ब्रेक दरम्यान त्याची अंगठ्याची तपासणी गेली आहे.  धवन याने १०९ चेंडूत ११७ धावांची खेळी केली आणि बाद झाला.  अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना त्याने क्षेत्ररक्षण केले नाही.  भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा याने त्याच्या ऐवजी क्षेत्ररक्षण केला आणि एक कॅचही पकडला. 

 

 

शिखर धवन याची ही दुखापत गंभीर आहे. त्याच्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तो वर्ल्ड कपचे आगामी तीन आठवड्यांचे सामने खेळू शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे. आता त्याच्या जागी रोहित शर्मा सोबत के. एल. राहुल डावाची सुरूवात करू शकतो. के. एल. राहुल याला बदली ओपनर म्हणून १५ सदस्यीय वर्ल्ड कप संघात स्थान देण्यात आले होते.  पण भारताचा क्रमांक ४ चा प्रश्न सुटत नसल्याने तसेच सराव सामन्यात बांग्लादेश विरूद्ध चौथ्या क्रमांकावर येऊन शतक झळकावल्यामुळे त्याला चौथ्या क्रमांकावर फिक्स करण्यात आले. पण आता धवन वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याने के. एल. राहुलवर वेगळी जबाबदारी दिली जाऊ शकते. आगामी न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात हे स्पष्ट होईल. तसेच यावेळी संघात तीन पैकी काोणाला संधी मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांत्यात ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात ३५२ धावांचा डोंगर भारताने रचला. याता शिखर धवन यांच्या शतकाचा महत्त्वाचा वाटा आहे. भारताने हा सामने ३६ धावांनी जिंकला. 

धवनचा रोहित सोबत विक्रम

शिखर धवनने रोहित शर्माच्या साथीने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतकांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलिया अॅड़म गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन यांच्या १६ शतकीय भागिदारीची बरोबरी केली आहे.  पहिल्या स्थानावर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या जोडीचा लागतो त्यांनी २१ वेळा शतकीय भागिदारी केली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Big Breaking जखमी शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर  Description: Shikhar Dhawan, India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या रविवारी खेळण्यात आलेल्या वर्ल्ड कप २०१९ च्या सर्वात मोठ्या सामन्यात शतक झळकाविणारा शिखर धवन वर्ल्ड कपमधून ३ आठवड्यांसाठी बाहेर झाला आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola