अखेर निर्णय झालाच, शिखर धवनच्या जागी 'या' खेळाडूचा टीममध्ये समावेश

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 12, 2019 | 13:38 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Shikhar Dhawan: टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे त्यामुळे तो २१ दिवस वर्ल्ड कप मॅचेसपासून दूर राहणार आहे. त्याच्या जागी आता टीम इंडियात दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

Shikhar Dhawan
शिखर धवन  |  फोटो सौजन्य: AP

मुंबई: टीम इंडियाचा सलामीवीर बॅट्समन शिखर धवन याच्या अंगठ्याला दुखापत झाली असून फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे पुढील २१ दिवस शिखर धवन हा वर्ल्ड कपच्या सामन्यांपासून दूर राहणार आहे. शिखर धवनच्या जागी कुठल्या प्लेअरला संधी दिली जाणार यासंदर्भात विविध चर्चा रंगल्या असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शिखर धवनच्या जागी टीम इंडियात ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. पीटीआय/भाषा च्या रिपोर्टनुसार, ऋषभ पंत लवकरच इंग्लंडसाठी रवाना होणार आहे.

पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागेवर खेळण्यासाठी टीमसोबत युवा विकेटकीपर आणि बॅट्समन ऋषभ पंत याचं नाव जोडलं आहे. ऋषभ पंत गेल्या वर्षभरापासून चांगलं प्रदर्शन करत आहे आणि तरीही त्याचा टीममध्ये समावेश न केल्याने विविध चर्चाही रंगल्या होत्या. आता ऋषभ पंतचा टीम इंडियात समावेश करण्यात आला असून तो बुधवारी इंग्लंडमध्ये पोहोचेल. न्यूझीलंड विरुद्ध मॅचच्या एक दिवसआधी ऋषभ पंत इंग्लंडमध्ये पोहोचत आहे. मात्र, जोपर्यंत टीम इंडियाचं व्यवस्थापन शिखर धवनच्या खेळण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेत नाही तोपर्यंत ऋषभ पंतचा समावेश टीम इंडियाच्या १५ सदस्यांमध्ये करता येणार नाहीये.

इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, 'टीम व्यवस्थापनाच्या आग्रहानुसार ऋषभ पंत याला शिखर धवनचा कवर म्हणून भारतातून बोलवण्यात आलं आहे. पंत ने गेल्या वर्षभरात खूपच चांगलं प्रदर्शन केलं आहे. ऋषभ पंत याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट मॅचेसमध्ये सेंच्युरी सुद्धा झळकावली आहे आणि यावरुन त्याचं प्रदर्शनाचा अंदाज येतो'.

सुनील गावस्कर यांच्यासोबतच इतरही माजी खेळाडूंनी शिखर धवनच्या अनुपस्थित त्याच्या जागी ऋषभ पंतचा टीममध्ये समावेश करण्याचं म्हटलं होतं. शिखर धवनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला बॉल लागल्याने दुखापत झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी