ICC World Cup 2019: दुखापतीमुळे बाहेर झालेला शिखर धवन काय म्हणतोय बघा तरी!

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 12, 2019 | 16:42 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवन वर्ल्ड कप २०१९ च्या पहिल्या सामन्यादरम्यान जखमी झाला आहे. त्यानंतर वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यानंतर शिखरनं पहिली प्रतिक्रीया दिली आहे. ट्विटकरून त्यानं प्रतिक्रीया शेअर केली.

Shikhar Dhawan
ICC World Cup 2019: दुखापतीमुळे बाहेर झालेला शिखर धवन काय म्हणतोय बघा तरी!तीमुळे बाहेर झालेला शिखर धवन काय म्हणतोय बघा तरी!  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबईः आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ सध्या सुरू आहे. त्यातच टीम इंडियाच गब्बर म्हणजेच शिखर धवन अंगठ्याला दुखापत झाल्यानं वर्ल्ड कप २०१९ मधून बाहरे पडला आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीममध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात शिखर धवननं ११७ धावाची खेळी केली. या खेळीदरम्यान शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली. भारताचा सलामी बॅट्समन शिखर धवन आता दुखापतीमुळे वर्ल्ड कपमध्ये त्याला ३ आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. यामुळे शिखर जवळपास तीन आठवड्यांसाठी वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. त्यानंतर शिखर धवननं पहिल्यांदा आपली प्रतिक्रीया ट्विटरवर व्यक्त केली. धवन बाहेर झाल्यानंतर त्याच्या जागी विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतला इंग्लंडला बोलावून घेतलं आहे. 

धवननं आपल्या ट्विटमध्ये प्रसिद्ध कवी डॉ. राहत इंदौरी यांची शायरीचा वापर करत लिहिलं की, कभी महक की तरह हम गुलों से उड़ते हैं, कभी धुएं की तरह हम पर्वतों से उड़ते हैं, ये कैंचियां हमें उड़ने से खाक रोकेंगी, कि हम परों से नहीं हौसलों से उड़ते हैं।'

 

 

धवनच्या या ट्विटमधून हे स्पष्ट होतं की दुखापतीमुळे शिखर वर्ल्ड कपमधून बाहेर आहे. मात्र अजूनही शिखरनं धैर्य सोडलं नाही आहे. शिखरला आपल्या रिकव्हरीसंबंधी विश्वास आहे. धवनला वर्ल्ड कपमधून २१ दिवसांसाठी बाहेर केलं गेलं आहे. त्याच्याजागी तरूण विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतला टीममध्ये समाविष्ठ करून घेतलं आहे. 

दुखापतीमुळे बाहेर झालेल्या धवननं ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना शानदार शतक झळकावलं. यावेळी टीम इंडियाचा ३६ धावांनी विजय झाला. धवननं टीममधून आऊट झाल्यानं विराट कोहलीच्या नेतृत्वाच्या टीम इंडियासाठी एक मोठा झटका आहे. 

शिखर धवनला फलंदाजी करताना अंगठ्याला दुखापत झाली. त्याचा अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे.शिखर धवन याला नाथन कुल्टन नाइल यांच्या चेंडूवर डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला त्वरित उपचार देण्यात आले. फिजिओ पॅट्रिक फरहार्ट  यांनी ब्रेक दरम्यान त्याची अंगठ्याची तपासणी गेली आहे.  धवन याने १०९ चेंडूत ११७ धावांची खेळी केली आणि बाद झाला.  अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना त्याने क्षेत्ररक्षण केले नाही.  भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा याने त्याच्या ऐवजी क्षेत्ररक्षण केला आणि एक कॅचही पकडला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी