Captaincy काढून घेतल्यानंतर Shikhar Dhawan ने विमानतळावरच काढली रात्र

IND vs ZIM: भारतीय संघ शनिवारी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाला. बीसीसीआयने ट्विटरवर प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासह शिखर धवन, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांची छायाचित्रे पोस्ट करून याची माहिती दिली.

Shikhar Dhawan was seen sleeping at the airport at midnight after being removed from the captaincy
Captaincy काढून घेतल्यानंतर Shikhar Dhawan ने विमानतळावरच काढली रात्र  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारतीय संघ मध्यरात्री झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना
  • भारतीय संघात परतल्यावर केएल राहुलचे स्वागत केले.
  • विमानतळावर झोपलेला दिसला शिखर धवन

IND vs ZIM: भारतीय संघ शनिवारी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाला. बीसीसीआयने ट्विटरवर प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण, शिखर धवन, दीपक चहर यांच्यासह अनेक खेळाडूंचे फोटो पोस्ट करून याची माहिती दिली. भारताला झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्टला खेळवला जाईल, तर इतर दोन सामने 20 आणि 22 ऑगस्टला होतील. केएल राहुल झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधार असेल. (Shikhar Dhawan was seen sleeping at the airport at midnight after being removed from the captaincy)

अधिक वाचा : महिला आयपीएलसाठी बीसीसीआयचा प्लॅन तयार, पाहा कधीपासून सुरु होणार

31 जुलै रोजी बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी 15 जणांचा संघ जाहीर केला होता आणि त्यावेळी संघाची कमान शिखर धवनकडे सोपवण्यात आली होती. पण काही दिवसांपूर्वी केएल राहुलने फिटनेस टेस्ट पास होऊन केवळ संघात स्थान मिळवले नाही, तर बीसीसीआयने त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली होती. या दौऱ्यावर आता धवन संघाचा उपकर्णधार आहे.

एवढेच नाही तर कर्णधाराशिवाय संघाचे प्रशिक्षकही या दौऱ्यापूर्वी बदलले आहेत. आशिया चषकापूर्वी नियमित प्रशिक्षक राहुल द्रविडला विश्रांती दिल्यानंतर बीसीसीआयने व्हीव्हीएस लक्ष्मणला मुख्य प्रशिक्षक म्हणून झिम्बाब्वेला पाठवले आहे. दरम्यान, सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धवन सोफ्यावरच झोपलेला दिसत आहे. शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.

अधिक वाचा : ... म्हणून Arjun Tendulkar सोडणार मुंबई !, गोव्याकडून क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी MCA कडून मागितली NOC
भारताचा एकदिवसीय संघ विरुद्ध झिम्बाब्वे: केएल राहुल (क), शिखर धवन (वीसी), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव , अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर।

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी