मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज(india vs west indies) यांच्यात ६ फेब्रुवारीपासून मालिकेला सुरूवात होत आहे. टीम इंडियासाठी(team india) घरच्या मैदानावरील ही मालिका आहे. तर वेस्ट इंडिज(west indies) आपल्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळून येत आहे. भारताविरुद्धच्या या महत्त्वाच्या मालकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात शिमरोन हेटमायरला(shimron hetmyer) स्थान देण्यात आलेले नाही. या निर्णयामुळे सारेच हैराण झाले आहेत. मात्र आता समजले आहे की शिमरोन हेटमायर फिटनेसच्या कारणामुळे संघाबाहेर आहे. त्याने फिटनेस टेस्ट फेल केली होती. shimron hetmyer not choose for series against india due to fail in fitness test
समाचार एजन्सी पीटीआयनुसार शिमरोम हेटमायरला फिटनेसच्या कारणामुळे बाहेर ठेवण्यात आले. वेस्ट इंडिजचे कोच फिल सिमन्स यांनी नाराजी व्यक्त केली की शिमरोन हेटमायरचे फिटनेसबाबतीतले वागणे योग्य नाही.
अधिक वाचा - वर्धा अपघातापूर्वीचा 'तो' व्हिडीओ आला समोर
इंग्लंडविरुद्ध मालिकेआधी २५ वर्षीय शिमरोन हेटमायर फिटनेस टेस्टमध्ये फेल झाला होता. यानंतरही त्याने काही तयारी केली नाही. तेव्हा कोचने विधान केले होते की तो सातत्याने आपल्या सोबतच्या खेळाडूंना कमीपणा दाखवत आहे. वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी १६ खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. यातील अधिकाधिक खेळाडू ते आहेज जे यावेळेस इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळत होते. संघाने चांगली कामगिरी केली आणि याच कारणामुळे वेस्ट इंडिजने संघात कोणताही बदल केला नाही. वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-२ अशी जिंकली.
भारताविरुद्ध वेस्ट इंडिजचा संघ - किरेन पोलार्ड(कर्णधार), निकोलस पूरन(उप-कर्णधार), फॅबियन एलन, डॅरेन ब्रावो, रोस्टॉन चेज, शेल्डन कॉटरेल, डोमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाय होप, एकिल हुसैन, ब्रँड किंग, रॉवमॅन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, ऑडियन स्मिथ, काइल मेयर्स, हेडन वाल्श ज्युनियर
अधिक वाचा - अर्थसंकल्पात रेल्वेसाठी या मोठ्या घोषणांची शक्यता
वन डे साठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण, आवेश खान
टी २० साठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल