सानिया मिर्झाची टिंगल करणाऱ्यांवर भडकला वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 20, 2019 | 17:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदा शोएब अख्तर म्हणाला, मला समजत नाही की पाकिस्तानच्या पराभवाला काही पाकिस्तानी फॅन्स सानिया मिर्झाला का जबाबदार धरत आहेत. जाणून घ्या काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग याबाबत... 

sania mirza and shoib malik
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक 

नवी दिल्ली :  शोएब अख्तर आणि वीरेंद्र सेहवाग सानिया मिर्झाची टिंगल उडविणाऱ्यांवर जबरदस्त भडकले आहेत. वर्ल्ड कप २०१९ मध्ये रविवारी भारताकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पाकिस्तानी फॅन्सने सानिया मिर्झाला टीकेचे लक्ष्य केले आहे. भारतीय टेनिस स्टार सानियाला फॅन्सने पाकिस्तानच्या पराभवाला कारणीभूत ठरवले आहे. सानियाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती आपला पती पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकसोबत डिनर करत आहे. शीशा बारमध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. भारताने पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये ७ व्यांदा पराभूत केल्यानंतर होत आहे. 

पाकिस्तानची अभिनेक्षी वीणा मलिकचाही या ट्रोलर्समध्ये समावेश आहे. तिने सार्वजनिक पद्धतीने सानिया मिर्झाला ट्विट करून आपली चिंता व्यक्त केली. वीणाने ट्विट केले की, सानिया मला तुझ्या मुलाची चिंता वाटते. तुम्ही त्याला शीशा बारला घेऊन गेलात. काय हे खतरनाक नाही? आणि माझ्या माहितीनुसार ही जागा जंक फूडसाठी प्रसिद्ध आहे, जे अॅथलिटसाठी चांगले नसते. हे तुलाही माहिती असेल तू आई आहे आणि एक अॅथलिटपण... 

यावर सानियाने वीणाला तगडे उत्तर देत तीन ट्विट करून आपले म्हणणे पूर्ण केले. सानियाने हे पण म्हटले की मी पाकिस्तान क्रिकेट टीमची डायटिशन नाही आणि त्यांची आई पण नाही. सानियाने वीणाला आठवण करून दिली की ती कोणापेक्षाही जास्त आपल्या मुलाची काळजी घेते. 

फॅन्सवर भडकला शोएब अख्तर

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदा शोएब अख्तर म्हणाला, मला समजत नाही की पाकिस्तानच्या पराभवाला काही पाकिस्तानी फॅन्स सानिया मिर्झाला का जबाबदार धरत आहेत.  अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटले की, लोक सानिया मिर्झावर पाकिस्तानच्या पराभवाचा आरोप करत आहे. पाकिस्तानचे फॅन्स म्हणतात की ती पाकिस्तानच्या पराभवाला कारणीभूत आहे. तिची काय चूक आहे. ती अनेक वेळा ट्विटरवर भारत आणि पाकिस्तानच्या हल्ल्याचा शिकार बनते. आता पाकिस्तानी तिच्या मागे पडले आहेत. हे विचारत आहेत की ती त्या ठिकाणी का गेली. 

अख्तरने पुढे म्हटले की, शोएब मलिक तिचा पती आहे. ते काही खाण्यासाठी बाहेर गेले होते. त्यात चूक ते काय? शोएबच्या यूट्यूब चॅनलवर आलेल्या वीरेंद्र सेहवागने म्हटले की, संघ चांगले प्रदर्शन करत नसेल, पण एखाद्या खेळाडूच्या खासगी आयुष्यावर मस्करी करणे चुकीचे आहे. 

वीरूचा ट्रोलरवर हल्ला... 

वीरूने म्हटले की, मला नाही वाटत की एखाद्या खेळाडूच्या प्रोफेशनल करिअरला खासगी आयुष्याशी जोडले पाहिजे. मी यापूर्वीही सांगितले आहे की विराट आणि अनुष्का एकत्र फिरतात. मला वाटते की, एखाद्याच्या कुटुंबाविषयी टिपण्णी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या संघातील खेळाडूंप्रति कितीही भावूक असले तरीही, तुम्ही त्यांच्या खासगी आयुष्यात डोकवले नाही पाहिजे. 

सेहवाग पुढे म्हणाला, कोणाला हा हक्क नाही की त्यांनी पाहावं आणि कमेंट करावी की सानिया मिर्झा आणि तिचा पती कुठे जातो आहे, काय खातो आहे.  कोणाच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. ते मलिकचे आयुष्य आहे. त्याला भारत-पाकिस्तान सामन्याची तयारी करण्याची गरज होती. आणि तो त्याच्या पद्धतीने करू शकतो. तो सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. 

सेहवाग म्हणाला की, काही खेळाडू ६ वाजता जागे होतात, तर काही असेही खेळाडू आहेत की सकाळी ६ वाजेपर्यंत बाहेर असतात. मला यात काही वावगं वाटत नाही. हे खरं आहे की शोएब मलिक धावा करत नाही, त्याला सामन्यातून बाहेर केले पाहिजे, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणे आणि तो आपल्या पत्नीसोबत डिनरला का गेला होता आणि रात्री उशीरा का परतला, या वर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सानिया मिर्झाची टिंगल करणाऱ्यांवर भडकला वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर Description: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदा शोएब अख्तर म्हणाला, मला समजत नाही की पाकिस्तानच्या पराभवाला काही पाकिस्तानी फॅन्स सानिया मिर्झाला का जबाबदार धरत आहेत. जाणून घ्या काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग याबाबत... 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola