Sania-shoaib: घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान शोएबने केलेले हे ट्वीट होतेय जबरदस्त व्हायरल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 15, 2022 | 11:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shoaib Malik tweet: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, दोघांनी याबद्दल कोणतेही विधान केलेले नाही. 

sania shoaib
घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान शोएबचे ट्वीट होतेय व्हायरल 
थोडं पण कामाचं
  • शोएबने मंगळवारी ट्विटरवर सानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
  • त्याने सानियासोबतचा एक फोटो शेअर केला यात दोघेही अतिशय खुश दिसत आहेत.
  • काही चाहत्यांचे म्हणणे आहे की दोघांमधील घटस्फोटांच्या चर्चा केवळ पीआर स्टंट आहे

मुंबई: पाकिस्तानचा ऑलराऊंडर आणि माजी कर्णधार(Pakistani cricketer)  शोएब मलिक(shoaib malik) आणि भारताची टेनिस स्टार खेळाडू सानिया मिर्झा(indian tennis star sania mirza) यांच्यात नात्यात कडवटपणा आल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहेत.  गेल्या काही दिवसांपासून दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. असं बोललं जातंय की शोएब आणि सानिया यांच्यातील वैवाहिक जीवनात(married life)  सगळं काही आलबेल नाही आहे आणि लवकरच ते घटस्फोट घेऊ शकतात. मात्र घटस्फोटांच्या अफवा सुरू असतानाच शोएबने आपली पत्नी सानियाला बर्थडे विश केले आहे. सानिया आज आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहेत. तिचा जन्म 15 नोव्हेंबर  1986ला मुंबईत झाला होता. shoaib malik birthday wish to sania mirza on social media

अधिक वाचा - शेगावात भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीचा मेळा

शोएबची पोस्ट झाली व्हायरल

शोएबने मंगळवारी ट्विटरवर सानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने सानियासोबतचा एक फोटो शेअर केला यात दोघेही अतिशय खुश दिसत आहेत. शोएबने कॅप्शनमध्ये लिहिले, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला चांगले आरोग्य लाभो. वाढदिवसाच्या दिवसाची मजा घे.

शोएब मलिकची ही बर्थडे पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्सने आपापल्या अंदाजा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक लोकांनी म्हटलेय की दोघांनी असेच हसत राहा. त्याच्या या ट्वीटर काही तासांतच हजारो लाईक्स आले आहेत. 

सानिया-शोएब यांचा शो

नुकतीच काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की शोएब आणि सानिया एक टॉक शो घेऊन येत आहेत. या शोचे नाव मिर्झा मलिकक शो ठेवण्यात आले आहे. हा शो पाकिस्तानी चॅनेलवर असेल. दरम्यान शोच्या घोषणेने चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत.

काही चाहत्यांचे म्हणणे आहे की दोघांमधील घटस्फोटांच्या चर्चा केवळ पीआर स्टंट आहे. विशेष म्हणजे शोएब आणि सानिया यांनी 12 एप्रिल 2010ला हैदराबादमध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघांनी पारंपारिक समारंभात लग्न केले हते. शोएब आणि सानिया यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव इजहान मिर्झा मलिक आहे. इजहानचा जन्म 2018 मध्ये झाला होता. 

अधिक वाचा - या टिप्स वापरा, घरातील वातावरण बदलेल अन् सुख-समृद्धी येईल

या मॉडेलमुळे सानिया-शोएबमध्ये दुरावा?

शोएब मलिक आणि आयेशा उमर यांनी गेल्या वर्षी बोल्ड फोटोशूट केले होते. या फोटोशूटदरम्यान आयेशा आणि शोएब यांची मैत्री झाली जी लवकरच प्रेमांत रूपांतरित झाली. तिच्यामुळेच यांच्यात दुरावा आल्याचे अनेक रिपोर्ट्समधून बोलले जात होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी