व्हायरल झालेल्या या फोटोवर शोएब मलिकचं प्रत्त्युतर, सानिया संतापली

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 18, 2019 | 16:43 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

पाकिस्तानचा पराभव झाल्यानं फॅन्स खूप नाराज आहे. फॅन्स आणि काही क्रिकेट एक्सपर्टसच्या मते, पाकिस्तानी खेळाडू फिटनेसमध्ये खूप खराब आहे. काही लोकांनी पाकिस्तानच्या पराभवासाठी तर बर्गरला दोषी ठरवलं आहे. 

shoaib malik
व्हायरल झालेल्या या फोटोवर शोएब मलिकचं प्रत्त्युतर, सानिया संतापली  |  फोटो सौजन्य: Twitter

मॅनचस्टरः वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियासोबत पराभव झाल्यानं पाकिस्तानी क्रिकेटर्संवर टीका केली जात आहे. विराटच्या सेनेनं पाकिस्तानला ओल्ड ट्रेफर्डमध्ये डकवर्थ लुईस प्रणालीच्या आधारावर ८९ रननं पराभूत केलं. यासोबतच वर्ल्ड कपच्या इतिहासात भारतचा रेकॉर्ड ७-० असा झाला आहे. पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवामुळे फॅन्स खूप नाराज आहेत. पाकिस्तानी  क्रिकेटर्सं फिटनेसच्या बाबतीत खूप खराब असल्याचं मत फॅन्स आणि काही क्रिकेट एक्सपर्टंसनी व्यक्त केलं आहे.  काही लोकांनी पाकिस्तानचा पराभव हा बर्गर खाल्ल्यामुळे झाला असल्याचं देखील म्हटलं आहे. 

सामन्याच्या दिवशी पाकिस्तानी क्रिकेटर्संचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत ते डिनर करताना दिसत आहेत. यावेळी काही खेळाडू फ्लेवर्ड हुक्का मारताना दिसत आहेत. यावेळी पाकिस्तानचा बॅट्समन शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचा एक फोटो व्हायरल झाला. ज्यात अन्य सहकाऱ्यांसोबत डिनर करताना दिसत आहेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार लोकांच्या मते, भारत विरूद्ध होणाऱ्या सामन्याच्या आधी पाकिस्तानी खेळाडू बिनधास्त फिरत होते आणि रात्री पार्टी करत होते. त्यानंतर  पाकिस्तानी खेळाडूंवर बरीच टीका करण्यात आली.  इतक्या महत्त्वपूर्ण सामन्याच्या आधी खेळाडूंनी चांगला आराम करायला हवा होता, मात्र त्यांनी त्यांची पार्टी करणं खूप महत्त्वाचं वाटलं का, असा प्रश्न करण्यात आला. आता शोएब मलिकनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या टीकेला उत्तर दिलं आहे. मलिकनं आपल्या देशाच्या मीडियावर आरोप करत म्हटलं की, २० वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर ही अशा पद्धतीनं खासगी आयुष्यातील स्पष्टीकरण देताना खूप दुःख होत आहे. 

मलिकनं ट्विट केलं की, पाकिस्तानी मीडिया त्याच्या विश्वासार्हतेसाठी जबाबदार असेल तेव्हा? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० वर्षांहून अधिक आपल्या देशाची सेवा केल्यानंतर दुःख होतं की आपल्या खासगी आयुष्यासंबंधीत असलेल्या गोष्टींवर स्पष्टीकरण द्यावं लागतं आहे. हा व्हिडिओ १३ जूनचा नसून तर १५ जूनचा आहे. 

त्यानंतर आणखीन एक ट्विट करत मलिकनं लोकांना त्यांचा आदर राखण्याची मागणी केली आहे. मलिकनं ट्विटमध्ये म्हटलं की, सर्व अॅथलीट्सच्या वतीने मी तुम्हांला विनंती करतो की मीडिया आणि लोकांनी आमच्या कुटुंबियांशी संबंधित असलेली इज्जत तशीच राहू दे ज्यात त्यांना अशा  विचार आणि चर्चेत खेचण्याची गरज नाही आहे. असं करणं चांगलं नाही आहे. 

मलिकची पत्नी टेनिस स्टार सानिया मिर्झानं या सर्वं आरोपांवर उत्तर दिलं आहे. जेवण करत होतो आणि हो लोकांना सामना हरल्यानंतर जेवणाची परवानगी असते. 

या प्रकरणी सहा वेळा ग्रॅंडस्लॅम विजेतानं एका फॅनला चांगलंच उत्तर दिलं. एका फॅननं शोएब मलिक आणि सानिया मिर्झाला यांचा जेवतानाचा एक व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर ट्विटरवर सानियाला टॅग केला होता. सध्या व्हिडिओ शेअर केलेलं ट्विटर अकाऊंट आता डिलीट झालं आहे. 

सध्या पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स खूप नाराज आहेत. कारण वर्ल्ड कपच्या इतिहासात त्यांच्या टीमला प्रतिस्पर्धी भारताकडून सात वेळा पराभवाचा सामना करावा लागला. भारतानं पहिल्यांदा बॅटिंग करत रोहित शर्मा (१४०) आणि कॅप्टन विराट कोहली (७७) ची खेळी करत निर्धारित ५० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून ३३६ रन केले. त्यानंतर पाकिस्तानच्या टीमनं ४० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून २१२ रन करू शकली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
व्हायरल झालेल्या या फोटोवर शोएब मलिकचं प्रत्त्युतर, सानिया संतापली Description: पाकिस्तानचा पराभव झाल्यानं फॅन्स खूप नाराज आहे. फॅन्स आणि काही क्रिकेट एक्सपर्टसच्या मते, पाकिस्तानी खेळाडू फिटनेसमध्ये खूप खराब आहे. काही लोकांनी पाकिस्तानच्या पराभवासाठी तर बर्गरला दोषी ठरवलं आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola