IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी गेल्या मोसमात जबरदस्त धावा करणारा रजत पाटीदार दुखापतीमुळे यावेळेस आयपीएलच्या निम्म्या मोसमातून बाहेर जाऊ शकतो. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, पाटीदार संघाच्या प्रशिक्षण शिबिरापूर्वीच जखमी झाला आहे. पाटीदारांना ३ आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. एमआरआय स्कॅननंतरच त्याची खेळण्याची स्थिती स्पष्ट होऊ शकते. मात्र, संघात येण्यापूर्वी त्याला एनसीएची मंजुरी घ्यावी लागणार आहे. (Shock to Rcb before IPL 2023 starts, star player out of team)
अधिक वाचा : IPL2023: Jio चा धमाकेदार रिचार्ज, डीटीएचशिवाय टीव्ही चॅनलवर पाहता येणार मोफत IPL सामने
रजत पाटीदारने २०२२ च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी जबरदस्त फलंदाजी केली होती. गेल्या वर्षीच्या मेगा लिलावात पाटीदारला विकत घेतले गेले नसले तरी यष्टीरक्षक लवनीथ सिसोदिया जखमी झाल्यानंतर आरसीबीने पाटीदारचा संघात समावेश केला होता. आरसीबीसाठी, पाटीदारने विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसनंतर 2022 च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या. त्याने खेळलेल्या 8 सामन्यात 333 धावा केल्या.
अधिक वाचा : WPL Final 2023 MI vs DC: मुंबई विरुद्ध दिल्ली रंगणार WPL फायनल, असं पहा फ्री मध्ये LIVE streaming
रजत पाटीदारच्या अर्ध्या सीझनमधून बाहेर पडल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. पाटीदार संघाची सलामी सांभाळत होता, मात्र आता त्याच्या अनुपस्थितीत विराटसोबत कोणता खेळाडू सलामीसाठी संघात उतरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाटीदारच्या आधी संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडही दुखापतग्रस्त आहे. त्याच्या खेळण्यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे.