श्रीलंका दौऱ्यावर श्रेयस अय्यरला मिळू शकते नेतृत्वाची संधी, सर्जरीनंतर सुरू केले वर्कआऊट

Shreyas Iyer Fitness Update: श्रेयस अय्यर खांद्याच्या सर्जरीतून बराझाला आहे. अय्यर जर पूर्णपणे फिट झाला तर श्रीलंका दौऱ्यावर त्याला भारतीय संघाचे नेतृत्व दिले जाऊ शकते. 

shreyas iyyer
श्रीलंका दौऱ्यावर श्रेयस अय्यरला मिळू शकते नेतृत्वाची संधी 

थोडं पण कामाचं

  • श्रेयस अय्यरला इंग्लंड सीरिजदरम्यान दुखापत झाली होती.
  • भारत जुलै महिन्यात तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जात आहे.
  • जर श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट असेल तर श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व त्याच्याकडे दिले जाऊ शकते.

मुंबई: भारतीय संघासाठी(indian team) खुशखबर आहे. वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यरने(shreyas iyer) खांद्याच्या सर्जरीनंतर सोपे वर्कआऊट(workout) सुरू केले आहे. भारत जुलै महिन्यात तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. भारताचे प्रमुख खेळाडू त्यावेळेस इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत असतील. अशातच जर श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट असेल तर श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व त्याच्याकडे दिले जाऊ शकते. अय्यर आयपीएमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि घरगुती क्रिकेट स्तरावर मुंबईचे नेतृत्व करत. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२०मध्ये फायनलपर्यंत प्रवास केला होता.(shreyas iyer can get captainship in srilanka tour of india)

श्रेयस अय्यरला इंग्लंड सीरिजदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. ८ एप्रिलला अय्यरच्या खांद्याची सर्जरी झाली. एक दिवसआधीच अय्यरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने घरीच वर्कआऊट सुरू केले आहे. अय्यरने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलो केला आहे त्यात लिहिले आहे की, काम सुरू आहे. येथे पाहत राहा. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)

अय्यरने वनडे फॉर्मेटमद्ये चांगली कामगिरी केली होती. या फलंदाजाने २२ सामन्यांत ४२पेक्षा जास्त सरासरीने ८१३ धावा केल्या आहेत. तर टी२०मध्ये अय्यरने २९ सामन्यांत ५५० धावा केल्या आहेत. जर अय्यर पूर्णपणे फिट असेल तर शिखर धवन अथवा हार्दिक पांड्याच्या जागी त्याला नेतृत्वाची संधी मिळू शकते. 

श्रीलंका दौऱ्यासाठी दावेदार - पृथ्वी शॉ, शिखर धवन, देवदत्त पडिक्कल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, मनीष पांडे, ऋतुराज गायकवाड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल तेवतिया, शिवम दुबे, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, हर्षल पटेल, खलील अहमद, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, वरूण चक्रवर्ती, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि राहुल चाहर. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी