IND vs SA: श्रेयस अय्यर बनला भारताच्या पराभवाचा व्हिलन

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 10, 2022 | 13:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs SA 1st T20I:श्रेयस अय्यरने १६व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर रासी वेन डूर डुसैनचा सोपा कॅच सोडला. या जीवदानानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 

team india
IND vs SA: श्रेयस अय्यर बनला भारताच्या पराभवाचा व्हिलन 
थोडं पण कामाचं
  • १५व्या ओव्हरपर्यंत सामना बरोबरीत सुरू होता.
  • दक्षिण आफ्रिकेने ३ बाद १४८ धावा केल्या होत्या त्यांना विजयासाठी आणखी ६३ धावा हव्या होत्या.
  • क्षिण आफ्रिकेच्या विजयात डेविड मिलर आणि रासी वेन डर डुसैन चमकले

मुंबई: दक्षिण आफ्रिकाने(south africa) पहिल्या टी-२० सामन्यांत भारताला(india) ७ विकेटनी हरवत मालिकेत विजयी सुरूवात केली. यासोबतच पाहुण्या संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात डेविड मिलर(david miller) आणि रासी वेन डर डुसैन(rvd dussain) चमकले. टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना बोर्डावर २११ धावांचा विशाल स्कोर उभा केला होता. मात्र डेविड मिलर आणि वेन डर डुसैनच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर पाहुण्या संघाने हे आव्हान ५ बॉल राखत पूर्ण केले. Shreyas iyyer became villain of indias  lost against south africa

अधिक वाचा - CCTV Video : वरळीत सी लिंकवर अपघात, टॅक्सीने दोघांना उडवले

श्रेयस अय्यर बनला टीम इंडियाचा व्हिलन

१५व्या ओव्हरपर्यंत सामना बरोबरीत सुरू होता. दक्षिण आफ्रिकेने ३ बाद १४८ धावा केल्या होत्या त्यांना विजयासाठी आणखी ६३ धावा हव्या होत्या. या दरम्यान डेविड मिलर ५० आणि डुसैन ३ बॉलमध्ये २९ धावा करत होते. १६व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर डुसैनने डीप मिड विकेटच्या दिशेने शॉट खेळला.

तेथे उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने सोपा कॅच सोडला आणि येथूनच भारताच्या पराभवाची कहाणी सुरू झाली. डुसैनने या मिळालेल्या जीवदानाचा चांगलाच फायदा उचलला आहे. त्याने पुढील १५ बॉलमध्ये ४५ धावा ठोकल्या. डुसैनने ४६ बॉलमध्ये ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरच्या या चुकीमुळे भारत सलग १३वा टी-२० सामना जिंकण्याच्या इतिहासापासून दूर राहिला. 

मिलर ठरला किलर

डुसैनच्या व्यतिरिक्त मिलरनेही द. आफ्रिकेच्या विजयात मोलाचे योगदान दिले. मिलरने भारताविरुद्धच्या या सामन्यात मिलरने २२ चेंडूवर तुफानी अर्धशतक ठोकत ३१ बॉलमध्ये ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६४ धावांची नाबाद खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वर्षांनी मिलरचे हे किलर रूप पाहायला मिळाले.  

किशनची धमाकेदार खेळी

आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड हे सलामीसाठी आले. इशान किशनने यावेळी जबरदस्त खेळी केली. पिचवर आपला जम बसवल्यानंतर त्याने आफ्रिकेच्या बॉलर्सवर हल्ला बोल करण्यास सुरूवात केली आणि चौकार-षटकारांचा पाऊस सुरू केला. 

अधिक वाचा - चहा सोडा आणि करोडपती व्हा

टी-२० करिअरमधील तिसरे अर्धशतक

करिअरमधील ११वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळताना इशान किशनने तिसरे अर्धशतक ठोकले. ११ टी-२०मध्ये एकदा नाबाद राहताना ३६.५०च्या सरासरीने आणि १२७.६०च्या स्ट्राईक रेटने त्याने ३६५ धावा केल्यात. या दरम्यान त्याचा सर्वोत्कृष्ट स्कोर ८९ इतका आहे. 

भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना १२ जूनला कटकमध्ये खेळवला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी