IND vs SA:राहुल-पांड्या नव्हे तर हा फलंदाज उडवणार आफ्रिकन गोलंदाजाची दाणादाण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 06, 2022 | 14:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs South Africa: भारत आणि दक्षिम आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरूवात होत आहे. ९ जून ते १५ जूनपर्यंत ही मालिका रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या टी-२० मालिकेसाठी निवड समितीनेअनेक युवांना संधी दिली आहे. 

team india
राहुल-पांड्या नव्हे तर हा फलंदाज उडवणार आफ्रिकेची दाणादाण 
थोडं पण कामाचं
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या टी-२० मालिकेसाठी केएल राहुलकडे नेतृत्व देण्यात आले आहे.
  • श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या सारख्या खेळाडूंना मिडल ऑर्डरमध्ये संधी देण्यात आली आहे.
  • आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत जर तिसऱ्या स्थानावर श्रेयस अय्यर हिट राहिला तर विराट कोहलीच्या स्थानाला धोका निर्माण होऊ शकतो.

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका(india vs south africa) यांच्यातील ५ सामन्यांची टी-२० मालिका ९ जून ते १९ जूनपर्यंत रंगणारआहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या टी-२० मालिकेसाठी निवड समितीने अनेक यवा खेळाूंना संधी दिली आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह सारख्या वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला आहे. shreyas iyyer can gud batting against south africa

अधिक वाचा - बारावीच्या निकालाची तारीख ठरली

राहुल-पांड्या नव्हे तर हा फलंदाज उडवणार आफ्रिकन गोलंदाजीची दाणादाण

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या टी-२० मालिकेसाठी केएल राहुलकडे नेतृत्व देण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या सारख्या खेळाडूंना मिडल ऑर्डरमध्ये संधी देण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरला दक्षिण आफ्रकेविरुद्धच्या या टी-२० मालिकेत तिसऱ्या स्थानावर उतरवण्याची पूर्ण शक्यता आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही श्रेयस अय्यरने तिसऱ्या स्थानावर फलंदाजी केली होती. 

याने उडवली गोलंदाजांची दाणादाण

योगायोगाने श्रीलंकेविरुद्ध त्या टी-२० मालिकेत विराट कोहलीला आराम देण्यात आला होता. श्रेयस अय्यरने त्या टी-२० मालिकेचा फायदा उचलताना तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करत २०४ धावा ठोकल्या होत्या. श्रेयस अय्यरला त्या टी-२० मालिकेत मॅन ऑफ दी सीरिजचा अवॉर्ड मिळाला होता. 

कोहलीचे स्थान धोक्यात

आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत जर तिसऱ्या स्थानावर श्रेयस अय्यर हिट राहिला तर विराट कोहलीच्या स्थानाला धोका निर्माण होऊ शकतो. श्रेयस अय्यरनेही तिसऱ्या स्थानावर फलंदाजीची इच्छा व्यक्त केली आहे. 

अधिक वाचा - शाळा सुरु होण्याबाबत शिक्षणमंत्र्यांचं महत्त्वाचं विधान

अशी असणार टीम

लोकेश राहुल (कर्णधार), रूतुराज गायकवाड़, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उप कप्तान, विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी