IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत हा खेळाडू करतोय पदार्पण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 24, 2021 | 19:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs New Zealand: भारताचा तात्पुरता कर्णधारर अजिंक्य रहाणेने बुधवारी याला दुजोरा दिला की श्रेयस अय्यर कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पदार्प करत आहे. 

shreyas iyyer
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत हा खेळाडू करतोय पदार्पण 
थोडं पण कामाचं
  • न्यूजीलंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्यासाठी भारतासमोर सवाल होतो की चौथ्या स्थानावर कोण खेळणार?  
  • विराट कोहली आणि ऋषभ पंत नल्याने मधली फळी आधीच कमकुवत दिसत आहे.
  • याशिवाय लोकेश राहुलही दुखापतीमुळे बाहेर गेला आहे.

मुंबई: न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ २५ नोव्हेंबरपासून आपला पहिला कसोटी सामना (India vs New Zealand)खेळत आहे. पहिल्या कसोटीआधीच टीम इंडियाला एक मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला संघात स्थान देण्यात आले आहे. वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)ला काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. हे नक्की आहे की शुभमन गिल(Shubman Gill) आता पहिल्या कसोटीत मयांक अग्रवालह (Mayank Agarwal) सलामीला येणार आहे. मात्र चौथ्या स्थानावर कोण फलंदाजी करणार हे अद्याप निश्चित नाही. रहाणे आणि कोच राहुल द्रविडला  (Rahul Dravid) ला श्रेयस अय्यर की सूर्यकुमार यादव यापैकी एकाला निवडायचे होते. मात्र सामन्याच्या एक दिवसआधी श्रेयस अय्यरच्या पदार्पणाबाबत रहाणेने विधान केले आहे. Shreyas iyyer will debut in test match against new zealand

न्यूजीलंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्यासाठी भारतासमोर सवाल होतो की चौथ्या स्थानावर कोण खेळणार?  विराट कोहली आणि ऋषभ पंत नल्याने मधली फळी आधीच कमकुवत दिसत आहे. याशिवाय लोकेश राहुलही दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. हे ठीक करण्यासाठी श्रेयस अय्यरशिवाय सूर्यकुमार यादवही पर्याय होता. मात्र रहाणेने पत्रकार परिषदेत हे स्पष्टपण म्हटले आहे की श्रेयस अय्यर पदार्पण करत आहे
 
सर्जरीनंतर जास्त धावा करू शकला नाही अय्यर

श्रेयस अय्यर आपल्या खांद्याच्या सर्जरीनंतर खूप संघर्ष करत आहे. त्याने टीममध्ये दावा मजबूत करण्यासाठी खूप धावा केल्या नाहीत. तसेच बऱ्याच काळापासून तो निवड समितीच्या रडारवर आहे. 

श्रेयस अय्यर की सूर्यकुमार यादव? झाला निर्णय

डोमेस्टिक स्तरावर श्रेयस अय्यर शानदार खेळाडू आहे. त्याने ८१.५४च्या स्ट्राईक रेटने ५२.१८च्या सरासरीने ४५०० धावा केल्या आहेत. यात ५४ सामन्यांमध्ये १२ शतक आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान, कसोटी संघात अनेक नव्या खेळाडूंप्रमाणे श्रेयस अय्यरने गेल्या २४ महिन्यांमध्ये कोणताही रेड बॉल क्रिकेट खेळलेला नाही. 

पहिल्या कसोटीसाठी संभाव्य प्लेईंग ११

मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कप्तान), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी