मुंबई: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या(india vs west indies) मालिकेत धमाकेदार पद्धतीने ३-० असा विजय मिळवला. अशा पद्धतीने त्यांनी विंडीजला क्लीन स्वीप दिला. तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने(team india) ११९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात शुभमन गिलने(shubhaman gill) तुफानी खेळी करत ९८ धावा केल्या. तो आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय वनडेत शतक ठोकण्यापासून २ धावा दूर होता. मात्र गिलला नशिबाची साथ मिळाली नाही. यामुळे स्टेडियममध्ये बसलेल्या प्रत्येक चाहत्यालाही धक्का बसला. दुसरीकडे सामन्यानंतर शुभमन गिलने भावूक करणारे विधान केले.shubhaman gill can not complete his first century in match against west indies
अधिक वाचा - वजन झपाट्याने कमी करण्यासाठी या गोष्टींचा करा आहारात समावेश
शुभमन गिलने तिसऱ्या वनडेत ९८ चेंडूत ९८ धावांची खेळी केली. यात त्याने ७ चौकार आणि २ षटकार ठोकले. गिल जेव्हा ९८ धावांवर खेळत होता. तेव्हा मैदानावर पाऊस कोसळत होता त्यामुळे खेळ मध्येच थांबवावा लागला. मात्र जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा भारताला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यानंतर ५०-५० षटकांचा खेळ केवळ ३५ षटकांचा करण्यात आला. यामुळेच गिलला केवळ २ धावांमुळे शतक ठोकता आले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुभमन गिलचा हा सर्वोत्कृष्ट स्कोर आहे.
शतकापासून वंचित राहिल्यानंतर शुभमन गिलने खूपच भावूक विधान केले. त्याने याबाबत बोलताना सांगितले, मी शतकाची अपेक्षा करत होतो मात्र ते पाऊस माझ्या कंट्रोलमध्ये नव्हता. पहिल्या दोन वनडेत ज्या पद्धतीने बाद झालो त्यामुळे मी निराश हतो. मी बॉलप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला आणि प्रेशर योग्य पद्धतीने हँडल केले. मला केवळ आणखी एक ओव्हर हवी होती ज्याची मी अपेक्षा करत होतो. तीन सामन्यांमध्ये विकेटने शानदार खेळ केला. बॉल ३० ओव्हरनंतर थोडा ग्रिप करत होता.
अधिक वाचा - लॉकडाऊनमध्ये तयार केलं स्वतःचं विमान
शुभमन गिलने वेस्ट इंडिजविरुद्ध जबरदस्त खेळ दाखवला आणि तो टीम इंडियासाठी मॅच विनर बनून पुढे आला. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या सामन्यात ६४, दुसऱ्या वनडेत ४३ धावांची खेळी केली. तिसऱ्या सामन्यात त्याने ९८ धावांचे योगदान दिले. गिलच्या धमाकेदार कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ दी सीरिज निवडण्यात आले