ICC ODI Rankings: शुभमन गिलचा जलवा, वनडे रँकिंगमध्ये मिळवले हे स्थान

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 24, 2022 | 18:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shubhman gill: भारताचा सलामी फलंदाज शुभमन गिलने आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये ४५ स्थानांनी झेप घेत ३८वे स्थान गाठले आहे. या २२ वर्षी फलंदाजाने झिम्बाब्वेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या वनडे मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. 

shubhaman gill
शुभमन गिलचा जलवा, वनडे रँकिंगमध्ये मिळवले हे स्थान 
थोडं पण कामाचं
  • शुभमन गिलची मोठी झेप
  • आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये मिळवले ३८वे स्थान
  • माजी कर्णधार विराट कोहली ७४४ रेटिंगसह पाचव्या स्थानावर

मुंबई: भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल(shubhman gill) ४५व्या स्थानांनी झेप घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(icc) बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या वनडे रँकिंगमध्ये(one day ranking) ३८वे स्थान मिळवले आहे. या २२ वर्षीय फलंदाजाने झिम्बाब्वेविरुद्ध(zimbabwe) नुकत्याच संपलेल्या वनडे मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. शुभमन गिलने हरारेमध्ये खेळवण्यात आलेल्या शेवटच्या वनडे सामन्यात या प्रकारातील आपले पहिले शतक(९७ बॉलमध्ये १३० धावा) ठोकले होते. shubhman gill at 38th place in icc odi ranking

अधिक वाचा - "गाडीची टँक फुल केल्यास धावणार 650 KM"गडकरींची भन्नाट कल्पना

वनडे रँकिंगमध्ये शुभमन गिलचा जलवा

यातच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ७४४ रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. त्याला झिम्बाब्वे दौऱ्यावर आराम दिला होता. भारताचा कर्णधार रोहित शर्मा सहाव्या स्थानावर आहे. त्यालाही झिम्बाब्वे दौऱ्यावर आराम देण्यात आला होता. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांत १५४ धावा केलेल्या असताना अनुभवी सलामीचा फलंदाज शिखर धवन एका स्थानांनी घसरून १२व्या स्थानावर आला आहे. त्याने पहिल्या आणि तिसऱ्या वनडेत अर्धशतक ठोकले होते. 

रँकिंगमध्ये टॉपला बाबर आझम

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या एकूण ८९१ रेटिंगसह वनडे फलंदाजींच्या रँकिंगमध्ये टॉपवर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा रासी वान डेर डुसेनचा नंबर लागतो. त्याचे ७८९ रेटिंग पॉईंट आहेत. गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट टॉपवर आहे. तर ऑलराऊंडरच्या यादीत बांगलादेशचा शाकीब अल हसन पहिल्या स्थानावर आहे. 

१३० धावा ठोकत झिम्बाब्वेला धतले

शुभमनन गिलने आपल्या या खेळीदरम्यान ज्या पद्धतीने शॉट लगावले ते पाहून सारेच हैराण झाले. गिलने ९ वनडे सामन्यात आतापर्यंत १ शतक आणि ३ अर्धशतकांच्या मदतीने ४९९ धावा केल्या आहेत. वनडे सामन्यांमध्ये गिलची सरासरी ७० पेक्षा अधिक आहे. 

अधिक वाचा - 'हे' ५ साप चावले तर माणूस पाणीही मागत नाही!

टीम इंडियाला मिळाला नवा हिटमॅन

शुभमन गिल १३० धावांच्या खेळीत त्याने १ षटकार आणि १५ चौकार ठोकले. २२ वर्षीय युवा भारतीय फलंदाज शुभमन गिने आपल्या वनडे करिअरमधील ९व्याच सामन्यात ही कामगिरी केली. शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले १००० धावा पूर्ण केल्या आहेत. शुभमन गिलच्या फलंदाजी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यासारखा क्लास पाहायला मिळतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी