शुभमन गिलची तुफान खेळी, वेस्ट इंडिज ए विरुद्ध झळकावली डबल सेंच्युरी

भारताचा युवा क्रिकेटर शुभमन गिल याने वेस्ट इंडिज ए टीमच्या विरुद्ध टेस्ट मॅचमध्ये डबल सेंच्युरी झळकावली आहे. या डबल सेंच्युरीसोबतच शुभमन गिल याने टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर याचाही रेकॉर्ड मोडला आहे.

shubman gill
शुभमन गिल   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • शुभमन गिल याने खेळली 253 बॉल्समध्ये 204* रन्सची शानदार खेळी
  • हनुमा विहारीसोबत पाचव्या विकेटसाठी केली 315* रन्सची पार्टनरशिप
  • हनुमा विहारीची 216 बॉल्समध्ये 118* रन्सची खेळी
  • शुभमन गिल याने मोडला गौतम गंभीरचा रेकॉर्ड

टरौबा: भारताचा तरुण क्रिकेटर शुभमन गिल याने गुरुवारी इंडिया ए विरुद्ध वेस्ट इंडिज ए मधील टेस्ट मॅचमध्ये तुफानी इनिंग खेळली. शुभमन गिल याने गुरुवारी एक जबरदस्त इनिंग खेळत आपली डबल सेंच्युरी झळकावली. तसेच पाचव्या विकेटसाठी गिल याने हनुमा विहारी याच्यासोबत मिळून 315 रन्सची नॉट आऊट पार्टनरशिपही केली. शुभमन गिल याने 253 बॉल्समध्ये नॉट आऊट 204 रन्स केल्या तर हनुमा विहारी याने 216 बॉल्समध्ये नॉट आऊट 118 रन्सची इनिंग खेळली. शुभमन गिल याने आपल्या या जबरदस्त इनिंगमध्ये 19 फोर आणि 2 सिक्सरही लगावले.

टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये भारत ए टीमने 201 रन्सपर्यंतच मजल मारता आली. या इनिंगमध्ये शुभमन गिल याला खआतंही खोलता आलं नाही. त्यानंतर कृष्णप्पा गौथम याने जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन दाखवत 67 रन्स देत 6 विकेट्स घेतल्या. यामुळे वेस्ट इंडिज ए टीम 194 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची टीम ए ने 3 विकेट्स गमावत 23 रन्स केले होते. त्यानंतर मॅचच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिल याने टीमला सावरलं आणि एक जबरदस्त इनिंग खेळली. 

तिसऱ्या दिवशी शहबाज नदीन 13 रन्स करुन माघारी बरतला. त्यावेळी इंडिया ए टीमचाच स्कोअर 50 रन्स होता. नदीन आऊट झाल्यानंतर शुभमन गिल याला साथ दिली हनुमा विहारी याने. हनुमा आणि शुभमन या दोघांनी मिळून वेस्ट इंडिज ए टीमच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 315 रन्सची पार्टनरशिप केली. या दरम्यान शुभमन गिल याने डबल सेंच्युरी झळकावली आणि हनुमा विहारी याने दमदार सेंच्युरी लगावली. यानंतर भारताने आपली इनिंग 365/4 वर घोषीत केली.

यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर इंडिया ए टीमने दिलेलं 373 रन्सचं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज ए टीमने 37 रन्स केल्या होते. आता या मॅचमध्ये विजय मिळवण्यासाठी वेस्ट इंडिजच्या टीमला अद्याप 336 रन्सची आवश्यकता आहे.

शुभमनने मोडला गौतम गंभीरचा रेकॉर्ड 

शुभमन गिल याने खूपच कमी वयात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी करण्याचा कारनामा केला आहे. गिलने हा कारनामा वयाच्या 20व्या वर्षी म्हणजेच 19 वर्षे 334 दिवस इतकं वय असताना केला आहे. यापूर्वी गौतम गंभीर याने हा कारनामा 20 वर्षे आणि 124 दिवस वय असताना केला होता. गंभीरने हा कारनामा इंडिया बोर्ड प्रेसिडेंट XI कडून खेळताना झिम्बाब्वे विरुद्ध 2002मध्ये केला होता.

वेस्ट इंडिजमध्ये कारनामा करणारा तिसरा बॅट्समन

वेस्ट इंडिजमध्ये वयाच्या 20व्या वर्षी डबल सेंच्युरी झळकावण्याचा विक्रम करणारा शुभमन गिल हा तिसरा बॅट्समन बनला आहे. 1944 मध्ये पहिल्यांदा हा कारनामा बारबाडोस आणि त्रिनिदाद यांच्यात खेळलेल्या मॅचमध्ये फ्रेंक वोरवेल याने केला होता. त्यावेळी त्याचं वय 19 वर्षे 197 दिवस इतकं होतं. त्यानंतर हा कारनामा 1967 मध्ये बारबाडोस आणि जमैका यांच्यात खेळण्यात आलेल्या मॅच दरम्यान जेफ्री ग्रीनिज याने केला. त्यावेळी जेफ्रीचं वय 18 वर्षे 301 दिवस इतकं होतं. त्यानंतर आता 52 वर्षांनंतर एखादा टीनएजर बॅट्समन वेस्ट इंडिजच्या मैदानात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हा कारनामा करु शकला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
शुभमन गिलची तुफान खेळी, वेस्ट इंडिज ए विरुद्ध झळकावली डबल सेंच्युरी Description: भारताचा युवा क्रिकेटर शुभमन गिल याने वेस्ट इंडिज ए टीमच्या विरुद्ध टेस्ट मॅचमध्ये डबल सेंच्युरी झळकावली आहे. या डबल सेंच्युरीसोबतच शुभमन गिल याने टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर याचाही रेकॉर्ड मोडला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...