सचिन-सेहवाग-गावस्कर यांच्या यादीत सामील झाला Shubman Gill, शतक नाही ठोकले मात्र केला हा रेकॉर्ड

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 28, 2022 | 12:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

सलामीचा फलंदाज शुभमन गिलने वनडे मालिकेत तीन सामन्यांमध्ये अनुक्रमे ६४, ४३ आणि नाबाद ९४ धावा करत मिळून २०५ धावा केल्या. या त्याच्या कामगिरीमुळे त्याला प्लेयर ऑफ दी सीरिजचा अवॉर्ड देण्यात आला. 

shubhaman gill
सचिन-सेहवाग-गावस्करांच्या यादीत Shubman Gillचा समावेश 
थोडं पण कामाचं
  • शुभमन गिलने या सामन्यात नाबाद ९८ धावा केल्या.
  • तीन वनडे सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या गिलला प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
  • सोबततच त्याचा प्लेयर ऑफ दी सीरिजही निवडण्यात आले.

मुंबई: टीम इंडियाने(team india) बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध(india vs west indies) पावसाने खोडा घातलेल्या तिसऱ्या वनडेत ११९ धावांनी विजय मिळवला. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये(port of spain) खेळवण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात शिखर धवनच्या(shikhar dhawan) नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका ३-० अशी जिंकली. शुभमन गिलने(shubhman gill) या सामन्यात नाबाद ९८ धावा केल्या. यासह तो या विजयाचा हिरो ठरला. त्याने भारताला ३६ ओव्हरमध्ये ३ बाद २२६ इतका स्कोर उभारण्यास मदत केली. आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणारे विंडीजचे खेळाडू क्रीझवर टिकू शकले नाहीत आणि त्यांना २६ ओव्हरमध्ये केवळ १३७ धावा करता आल्या. भारताचा स्पिनर युझवेंद्र चहलने चार विकेट मिळवल्या. तर मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी २-२ विकेट मिळवल्या. shubhman gill enter in sachin-sehwag -gavaskar list

अधिक वाचा - राज्यातील या तीन शहरात राहील अपूर्ण घराचं स्वप्न

तीन वनडे सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या गिलला प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. सोबततच त्याचा प्लेयर ऑफ दी सीरिजही निवडण्यात आले. भारताच्या या सलामीवीराने तीनही सामन्यात भारताला चांगली सुरूवात करून दिली. शेवटच्या सामन्यात तो शतकाच्या जवळ होता मात्र पावसाने या युवा फलंदाजांची मजा किरकिरी केली. 

शुभमन गिल ९८ धावांवर नाबाद राहिला. सोबतच त्याने भारतीय फलंदाजाच्या एका खास यादीत आपले स्थान बनवले जे वनडेत ९० धावांवर नाबाद राहिले. या यादीत सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि सुनील गावस्करसारख्या महान फलंदाजांचा समावेश आहे. 

पाहा ही यादी

नाबाद ९३ - के श्रीकांत
नाबाद ९२ - सुनील गावस्कर
नाबाद ९६ - सचिन तेंडुलकर
नाबाद ९९ - वीरेंद्र सेहवाग
नाबाद ९७ - शिखर धवन
नाबाद ९८ - शुभमन गिल

अधिक वाचा - अभ्यास करता करता चिमुकला बोलला गंभीर गोष्ट

२२ वर्षीय गिल पहिल्या वनडेत ६४ धावा करून बाद झाला होता. तर दुसऱ्या वनडेत त्याचे अर्धशतक ७ धावांनी हुकले. तिसऱ्या सामन्यात तो अतिशय सावधगिरीने खेळत होता मात्र त्याचवेळेस पाऊस आला आणि खोडा घातला. दरम्यान, तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत त्याला १०० अंकी धावसंख्या गाठता न आल्याने त्याने खंत व्यक्त  केली मात्र तो त्याचा स्वभाविक खेळ खेळला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी