Ind vs Zim: टीम इंडियाला भेटला नवा हिटमॅन, झिम्बाब्वेसमोर भारताचे २९० धावांचे आव्हान

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 22, 2022 | 17:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Team India:शुभमन गिलच्या १३० धावांच्या तुफानी खेळीमध्ये १ सिक्स आणि १५ फोरचा समावेश आहे. २२ वर्षीय युवा भारतीय फलंदाज शुभमन गिलने आपल्या वनडे करिअरमधील ९व्या सामन्यातच शतक ठोकण्याची किमया साधली आहे. 

india vs zimbabwe
Ind vs Zim:टीम इंडियाला भेटला नवा हिटमॅन, केल्या इतक्या धावा 
थोडं पण कामाचं
  • शुभमन गिल १३० धावांच्या खेळीत त्याने १ षटकार आणि १५ चौकार ठोकले.
  • २२ वर्षीय युवा भारतीय फलंदाज शुभमन गिने आपल्या वनडे करिअरमधील ९व्याच सामन्यात ही कामगिरी केली.
  • शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले १००० धावा पूर्ण केल्या आहेत

मुंबई: टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलने झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात धमाकेदार शतक ठोकले. गिलचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे. शुभमन गिलने अवघ्या ८२ चेंडूतच आपले पहिले शतक पूर्ण केले. गिलने ९७ चेंडूत १३० धावांची खेळी केली. 

अधिक वाचा - पाच उपाय करा कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवा

टीम इंडियाला मिळाला नवा हिटमॅन

शुभमन गिल १३० धावांच्या खेळीत त्याने १ षटकार आणि १५ चौकार ठोकले. २२ वर्षीय युवा भारतीय फलंदाज शुभमन गिने आपल्या वनडे करिअरमधील ९व्याच सामन्यात ही कामगिरी केली. शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले १००० धावा पूर्ण केल्या आहेत. शुभमन गिलच्या फलंदाजी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यासारखा क्लास पाहायला मिळतो. 

१३० धावा ठोकत झिम्बाब्वेला धतले

शुभमनन गिलने आपल्या या खेळीदरम्यान ज्या पद्धतीने शॉट लगावले ते पाहून सारेच हैराण झाले. गिलने ९ वनडे सामन्यात आतापर्यंत १ शतक आणि ३ अर्धशतकांच्या मदतीने ४९९ धावा केल्या आहेत. वनडे सामन्यांमध्ये गिलची सरासरी ७० पेक्षा अधिक आहे. 

अधिक वाचा - ISच्या दहशतवाद्याला रशियात अटक, भारतात करणार होता घातपात

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

शुभमन गिल याआधी गेल्या महिन्यात विंडीज दौऱ्यावर शतक बनवण्याच्या जवळ होता मात्र दुर्देवाने पावसाने हजेरी लावली आणि त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही. अखेर २२ ऑगस्टला झिम्बाब्वेविरुद्ध गिलने आपले आंतरराष्ट्र्रीय शतक ठोकलेच.

भारताच्या धावांचा डोंगर

भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० ओव्हरमध्ये ८ बाद २८९ धावा केल्या. भारताकडून इशान किशनने ५० धावा ठोकल्या. तर शुभमन गिलने जबरदस्त १३० धावांची खेळी केली. या सामन्यात लोकेश राहुलला ४० धावा करता आल्या तर शिखर धवनने ४० धावा केल्या. दीपक हुड्डाने केवळ एक धाव केली. संजू सॅमसनलाही केवळ १५ धावा करता आल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी