Shubman Gill ने अचानक सोडली गुजरात टायटन्सची साथ? या IPL टीममध्ये सामील होण्याचे संकेत

Gujarat Titans: गुजरात टायटन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे, ज्यातून शुभमन गिल गुजरात टायटन्सपासून वेगळा होत असल्याचे दिसून येत आहे. यानंतर तो नव्या आयपीएल संघात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Shubman Gill suddenly quit Gujarat Titans? Hints to join this IPL team
Shubman Gill ने अचानक सोडली गुजरात टायटन्सची साथ? या IPL टीममध्ये सामील होण्याचे संकेत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुजरात टायटन्स फ्रँचायझीने केलेल्या ट्विटने सोशल मीडियावरील चाहते थक्क झाले
  • शुभमन गिल गुजरात टायटन्स सोडणार आहे
  • आगामी हंगामासाठी दुसर्‍या फ्रँचायझीमध्ये सामील होणार आहे.

मुंबई : आयपीएल २०२२ चे विजेतेपद गुजरात टायटन्सने जिंकले. शुभमन गिलने IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्ससाठी अप्रतिम खेळ दाखवला. गुजरातला ट्रॉफी मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. आता गुजरात टायटन्स फ्रँचायझीने ट्विटरवर एक ट्विट शेअर केले आहे, ज्यामुळे शुभमन गिल गुजरात टायटन्सपासून दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी शुभमन गिल आणखी एका आयपीएल संघात सामील होण्याचे संकेत मिळत आहेत. (Shubman Gill suddenly quit Gujarat Titans? Hints to join this IPL team)

अधिक वाचा : क्रिकेटच्या मैदानावर मोठी दुर्घटना!, गोलंदाजाच्या रागाचा Venkatesh Iyer ठरला बळी

गुजरात टायटन्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत लिहिले, 'तुमचा हा प्रवास संस्मरणीय ठरला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. याकडे शुभमन गिल आणि गुजरात टायटन्सचे वेगळेपण म्हणून पाहिले जात आहे. त्याला उत्तर देताना शुभमन गिलनेही हार्ट इमोजी बनवले. गिलला गुजरात संघाने IPL 2022 मध्ये 8 कोटी रुपयांमध्ये सामील केले होते.

23 वर्षीय शुभमन गिल उत्कृष्ट फॉर्ममध्ये चालत आहे. यापूर्वी त्याने आयपीएल 2022 च्या 16 सामन्यांमध्ये 483 धावा केल्या होत्या. त्याने गुजरात टायटन्ससाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले. गुजरातला पहिल्यांदा चॅम्पियन बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वी शुभमन गिलने कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. गिलने IPL 2022 च्या 74 सामन्यांमध्ये 32 च्या सरासरीने 1900 धावा केल्या आहेत.


केकेआर संघाने शुभमन गिलच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले असून त्यात त्याच्या केकेआरमध्ये सामील होण्याचे संकेत दिले आहेत. शुभमन गिल त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर अप्रतिम खेळ दाखवला आणि त्याने कामगिरीच्या जोरावर प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कारही जिंकला. गिलने भारतासाठी 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 499 धावा आणि 11 कसोटी सामन्यात 579 धावा केल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी