PAKला आपल्याच माणसांनी दिली ही जखम, हा खेळाडू कसा बनला 22.5 कोटी लोकांसाठी व्हिलन?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 28, 2022 | 15:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 World Cup: पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील अत्यंत चुरशीच्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला एका धावेने हरवले.

sikandar raza
हा खेळाडू कसा बनला PAK च्या 22.5 कोटी लोकांसाठी व्हिलन? 
थोडं पण कामाचं
  • पर्थमद्ये झिम्बाब्वेने टी20 वर्ल्ड कपमधल सामन्यात मजबूत मानल्या जाणारी टीम पाकिस्तानला एक धावेने हरवले
  • झिम्बाब्वेने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये  8 विकेट गमावत 130 धावा केल्या.
  • त्याच्या प्रत्युत्तरात बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाला 8 बाद 129 धावाच करता आल्या.

मुंबई: पाकिस्तानला(pakistan) टी20 वर्ल्ड कपमध्ये(t-20 world cup 2022) जबरदस्त धक्का बसला. त्यांना गुरूवारी पर्थमध्ये खेळवण्यात आलेल्या सुपर 12 राऊंडच्या मॅचमध्ये कमकुवत मानल्या जाणाऱ्या झिम्बाब्वे(zimbawbe) संघाने हरवले. या विजयाचा हिरो ठरला सिकंदर राजा. याचा जन्म तर पाकिस्तानात झाला मात्र त्याने पाकिस्तानलाच जखम दिली. sikander raza became man of the match in Pakistan vs Zimbabwe match

अधिक वाचा - प्रत्येकाने आपल्या बॅगेत ‘या’ वस्तू नेहमी ठेवाव्यात

पर्थमद्ये झिम्बाब्वेने टी20 वर्ल्ड कपमधल सामन्यात मजबूत मानल्या जाणारी टीम पाकिस्तानला एक धावेने हरवले. झिम्बाब्वेने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये  8 विकेट गमावत 130 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाला 8 बाद 129 धावाच करता आल्या. पाकिस्तानला सध्याच्या वर्ल्डकपमध्ये सलग दुसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. याआधी त्यांना भारताने हरवले होते. 

सिकंदर बनला मॅन ऑफ दी मॅच

झिम्बाब्वेचा ऑलराऊंडर सिकंदर राजा प्लेयर ऑफ दी मॅच ठरला. त्याने पर्थच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात माजी  चॅम्पियन पाकिस्तानच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये धाडले. रजाने 4 ओव्हरमध्ये 25 धावा देत तीन विकेट मिळवल्या. सिकंदर रजा एकाच झटक्यात पाकिस्तानात राहणाऱ्या 22.5 कोटी लोकांसाठी व्हिलन बनला. 

पाकिस्तानात झाला जन्म

सिकंदर रजाचा जन्म पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. 36 वर्षीय सिकंदर रजाने पाकिस्तानला या स्पर्धेत मोठी जखम दिली. सिकंदरचे आईवडील 2002मध्ये झिम्बाब्वेला गेले होते. त्याने 2007 मध्ये फर्स्ट क्लासमध्ये डेब्यू केले होते. 

Fighter Pilot बनायचे होते

सिकंदर रजाला लहानपणी फायटर पायलट बनायचे होते. त्याने वयाच्या 11व्या वर्षात हे स्वप्न ाहिले आणि मेहनत घेतली. त्याने एअर फोर्स कॉलेजमध्ये अॅडमिशनही घेतले. खास बाब म्हणजे तेथील 60 हजार उमेदवारांमधून निवडण्यात आलेल्या 60 विद्यार्थ्यांमध्ये त्याचे नाव होते. मात्र नंतर तो डोळ्यांसाठीच्या एका टेस्टमध्ये नापास झाला. नंतर त्याने क्रिकेटमध्ये करिअर बनवले.

अधिक वाचा - ट्विटर ताब्यात येताच मस्कने केली सीईओ पराग अग्रवाल हकालपट्टी

सिकंदरचे करिअर

सिकंदर रजाने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत  17 टेस्ट, 123 वनडे आणि 63 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात कसोटीत एक शतक आणि 8 अर्धशतकांच्या मदतीने 187, वनडेमध्ये 6 शतक आणि 20 अर्धशतकांच्या मदतीने 3656 आणि टी20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 6 फिफ्टी ठोकताना 1185 धावा केल्यात. सिकंदरने कसोटीत 34, वनडेमध्ये 70 आणि टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 36 विकेट मिळवल्या आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी