Singapore Open: सिंधूने जेतेपदासह रचला इतिहास, चीनच्या खेळाडूवर साकारला दणदणीत विजय

भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपनच्या (Singapore Open) अंतिम सामन्यात बाजी मारली आहे. पी.व्ही.सिंधूने (PV Sindhu) सिंगापूर खुल्या बॅडमिंटन (Badminton) स्पर्धेचे जेतेपद पटकावत इतिहास रचला आहे.

In the final match of the Singapore Open, P. Victory of V. Sindhu
सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात पी. व्ही.सिंधूचा विजय  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन (Badminton) स्पर्धेचे जेतेपद पटकावत इतिहास रचला
  • स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने चीनच्या वँग झी ही चा पराभव
  • सिंधूने उपांत्य पूर्व फेरीत जपानच्या सायना कावाकामीचा पराभव केला होता.

नवी दिल्ली : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपनच्या (Singapore Open) अंतिम सामन्यात बाजी मारली आहे. पी.व्ही.सिंधूने (PV Sindhu) सिंगापूर खुल्या बॅडमिंटन (Badminton) स्पर्धेचे जेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. यास्पर्धेचे जेतेपद पटकावणारी सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने चीनच्या वँग झी ही हिचा तीन गेम्समध्ये २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला. 

सिंगापूर ओपन २०२२ च्या अंतिम सामन्यात पी व्ही सिंधूनं अप्रतिम खेळी साकारली आहे. सिंधू आणि वँग यांच्यातील हा सामना चांगलाच रंगला होता. तिने पहिल्याच सेटमध्ये सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. पण दुसऱ्या सेटमध्ये चिनच्या वांग झी यीने कडवी झुंज दिली. परंतु अंतिम सेटमध्ये सिंधून चांगल्याप्रकारे पुनरागमन करत सिंगापूर ओपनवर आपले नाव कोरले आहे.  

पहिल्या गेममध्ये सिंधूने एका पाठोपाठ एक गुण पटकावले आणि वँगला मागे टाकले होते. सिंधूने हा पहिला गेम २१-९ असा सहजपणे जिंकला. सिंधूच्या या दमदार खेळीमुळे हा सामना सिंधू सहजपणे जिंकेल, असे वाटत होते. पण चीनच्या वँगने हार मानली नाही. दुसऱ्या गेममध्ये तिने जोरदार पुनरागमन करत सिंधूला कडवी झुंज देण्याता प्रयत्न केला. सिंधूने यावेळी थोडा फार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला खरा, पण तिला यावेळी जास्त गुण पटकावता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या गेमममध्ये वँगने २१-११ विजय साकारला.

Read Also : महाराष्ट्रातील 'या' शिवमंदिरात नंदीविना विराजमान आहेत महादेव

वँगच्या या विजयामुळे हा सामना १-१ असा बरोबरीत आला होता. त्यामुळे आता तिसरा गेम कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. तिसरा गेम हा दोन्ही खेळाडूंसाठी निर्णयाक ठरणार होता. कारण जो तिसरा गेम जिंकेल त्याला सामन्यासह जेतेपद पटकावता येणार होते.त्यामुळे तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी दमदार खेळ केला. तिसऱ्या गेममध्ये सिंधूने सर्वस्व पणाला लावल्याचे पाहायला मिळाले.सिंधूने यावेळी जोरदार फटके मारले आणि चीनच्या वँगला पुन्हा एक निष्प्रभ केले. तिसऱ्या गेममध्ये सिंधूने २१-१५ अशी बाजी मारली. 

Read Also : नवा ट्विस्ट, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट होणार

तत्पूर्वी, सिंधूने उपांत्य पूर्व फेरीत जपानच्या सायना कावाकामीचा पराभव केला होता. सिंधूने हा सामना २१-१५, २१-७ असा सरळ सेटमध्ये जिंकला. यावर्षी सिंधूने सयेद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस ओपन अशी दोन सुपर ३०० पदकं जिंकली आहेत. त्यानंतर सिंगापूर ओपनचं तिसरं पदकही तिने आपल्या नावावर केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पी व्ही सिंधूचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, “पी व्ही सिंधूने भारतासाठी चांगली बातमी दिली आहे. तिने पुन्हा एकदा आपली मान अभिमानाने उंचावली आहे. सिंगापूर ओपनचं पदक जिंकल्याबद्दल पी व्ही सिंधू तुझं खूप अभिनंदन. तू करोडो लोकांसाठी प्रेरणा आहेस.”

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी