U19 Team India : १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाच्या ६ खेळाडूंना कोरोना

Six Players From U19 Indian Cricket Team Tested Covid19 Positive : १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजला गेलेल्या भारतीय संघातील सहा खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटव्ह आली.

Six Players From U19 Indian Cricket Team Tested Covid19 Positive
१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाच्या ६ खेळाडूंना कोरोना 
थोडं पण कामाचं
  • १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाच्या ६ खेळाडूंना कोरोना
  • कर्णधार आणि उपकर्णधारासह सहा जणांना कोरोना
  • १७ पैकी ६ क्वारंटाइन आणि ११ खेळाडू मैदानावर

Six Players From U19 Indian Cricket Team Tested Covid19 Positive : नवी दिल्ली : १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजला गेलेल्या भारतीय संघातील सहा खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटव्ह आली. या खेळाडूंना क्वारंटाइन केले आहे. त्यांचे उपचार वैद्यकीय देखरेखीत सुरू आहेत. कोरोनाबाधीत झालेल्यांमध्ये कर्णधार यश धुल आणि उपकर्णधार एस. के. राशीद या दोघांसह मानव पारख, सिद्धार्थ यादव, आराध्य यादव आणि वासू वत्स या चार खेळाडूंचा समावेश आहे. भारताचे १७ खेळाडूंचे पथक वेस्ट इंडिजला गेले आहे. यापैकी सहा खेळाडूंना क्वारंटाइन केल्यामुळे उर्वरित ११ खेळाडू खेळणार आहेत. 

भारत ५ बाद ३०७ धावा

१९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि आयर्लंड यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० ओव्हरमध्ये ५ बाद ३०७ धावा केल्या. भारताने आयर्लंडला ५० ओव्हरमध्ये ३०८ धावा करण्याचे आव्हान दिले. भारताकडून हरनूर सिंहने ८८ आणि रघुवंशीने ७९ धावा केल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी