कर्णधार पेनने घातले स्मिथला चिटींगनंतरही पाठिशी 

सिडनी कसोटीनंतर आता ऑस्ट्रेलियाचा संघावर टीकेची झोड उठवली जात आहे. कर्णधार टीम पेनवर  स्लेजिंगसाठी  तर स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथवर रिषभ पंतच्या गार्डची खूण मिटविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

smith was not scuffing pants guard mark
कर्णधार पेनने घातले स्मिथला चिटींगनंतरही पाठिशी  

थोडं पण कामाचं

  • सिडनी कसोटीनंतर आता ऑस्ट्रेलियाचा संघावर टीकेची झोड उठवली जात आहे.
  • स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथवर रिषभ पंतच्या गार्डची खूण मिटविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
  • स्मिथचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो पंतच्या गार्डला आपल्या पायाने मिटविताना दिसत आहे.

सिडनी :  सिडनी कसोटीनंतर आता ऑस्ट्रेलियाचा संघावर टीकेची झोड उठवली जात आहे. कर्णधार टीम पेनवर  स्लेजिंगसाठी  तर स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथवर रिषभ पंतच्या गार्डची खूण मिटविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. स्मिथचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो पंतच्या गार्डला आपल्या पायाने मिटविताना दिसत आहे.  हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला असून त्यासाठी सोशल मीडियावर स्मिथवरही टीका होत आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पेनने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हटला असे घडले नव्हते, असे घडले असते तर टीम इंडियाने हा मुद्दा उपस्थित केला असता.

सोमवारी पहिल्या सत्राच्या ड्रिंक्स ब्रेक दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्मिथ फलंदाजाच्या गार्डच्या खुणा पायावर घासताना दिसला होता.  पंतने धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंतने ९७ धावांची निर्णायक खेळी केली. या खेळीनंतर भारताना विजय दिसत होता. पण पंत बाद झाल्यानंतर टेस्ट अनिर्णित राहिली. झालेल्या प्रकारावर स्पष्टीकरण देताना पेन म्हणाला, 'मी याविषयी स्टीव्हशी बोललो आणि मला माहिती आहे की ज्या प्रकारे गोष्टी दाखवल्या गेल्या त्याविषयी तो निराश झाला.  जर आपणास स्टीव्ह स्मिथ कसोटी क्रिकेट खेळताना  पाहिले तर , तर तो प्रत्येक सामन्यात दिवसातून पाच किंवा सहा वेळा असे  करतो.

'तो प्रत्येक सामन्यात हे करतो'

तो म्हणाला, 'तो नेहमी फलंदाजीच्या क्रीझवर उभा असतो, शॅडो फलंदाजी करतो, स्टीव्ह स्मिथ अशा गोष्टी करतो  हे आम्हाला माहित आहे, त्यातील एक क्रिसवर खूण तयार करणे होय.' स्मिथने गार्डची खूण बदलली असती तर भारतीय संघाने हा मुद्दा उपस्थित केला असता. पेन म्हणाला, "निश्चितच तो (स्मिथ) गार्डची खूण बदलत नव्हता आणि जर आपण विचार केला त्याने जर असे केले असते तर भारतीय खेळाडूंनी या मुद्द्याला तोंड फोडले असते." ऑस्ट्रेलियन कॅप्टन म्हणाला, “स्टीव्हबरोबर मी खेळल्या सामन्यांमध्ये, कसोटी सामन्यांमध्ये आणि शिल्ड सामन्यादरम्यान मैदानात त्याला बर्‍याच वेळा असे करताना मी पाहिले आहे, तेव्हा त्याला फलंदाजाच्या जागी जाऊन कल्पना करणे आवडते की तो कसे खेळेल.

बॉल टॅम्परिंगमुळे बंदीचा सामना करावा लागला होता स्मिथला

स्मिथचा व्हिडिओ समोर आल्यानंतर फलंदाजाला सोशल मीडिया चाहत्यांनी आणि भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्या टीकेचा सामाना करावा लागला. २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध केपटाऊनमध्ये झालेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात स्मिथ  बॉल टेंपरिंग वादात अडकला होता. स्मिथ आणि तत्कालीन उप-कर्णधार डेव्हिड वॉर्नरवर आंतरराष्ट्रीय आणि घरगुती क्रिकेटवर 12 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. स्मिथच्या जागी पेनला ऑस्ट्रेलियन संघाची कमान देण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी