मंधानाच्या सुपर सेंच्युरीचा video; १४ चौकार आणि ३ षटकार लगावत ठोकले तुफानी शतक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 18, 2021 | 19:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

महिला बिग बॅश लीगमध्ये शतक ठोकणारी मंधाना पहिली भारतीय क्रिकेटर आहे. पहिल्यांदा फलंदाजजी करताना मेलबर्नने १७५ धावा केल्या होत्या.

smriti mandhana
मंधानाच्या सुपर सेंच्युरीचा video; १४ चौकार आणि ३ षटकार 
थोडं पण कामाचं
  • भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मंधानाने धमाकेदार खेळी केली.
  • मेलबर्न रेनेगेड्सविरुद्ध खेळताना तिने ६४ चेंडूत ११४ धावा ठोकल्या.
  • या दरम्यान तिने १४ चौकार आणि ३ षटकार ठोरले.

मुंबई: ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येत असलेल्या महिला बिग बॅश लीगमध्ये भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मंधानाने धमाकेदार खेळी केली आहे. मेलबर्न रेनेगेड्सविरुद्ध खेळताना तिने ६४ चेंडूत ११४ धावा ठोकल्या. या दरम्यान तिने १४ चौकार आणि ३ षटकार ठोरले. महिला बिग बॅश लीगमध्ये शतक ठोकणारी मंधाना पहिली भारतीय क्रिकेटर आहे. पहिल्यांदा फलंदाजजी करताना मेलबर्नने १७५ धावा केल्या होत्या. मेलबर्नकडून हरमनप्रीत कौरने ५५ चेंडूत ८१ धावा केल्या होत्या. मात्र तिच्या या खेळीवर सिडनी थंडरकडून खेळणाऱ्या मंधानाने पाणी फिरवले. स्मृतीचा स्ट्राईक रेट १७८.१२ इतका होता. दरम्यान, मंधानाचा संघ हा सामना जिंकू शकला नाही. त्यांना ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र भारताच्या दोनही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियात तहलका माजवला.

अखेरच्या ओव्हरमध्ये हरमनप्रीतची कमाल

सामन्यात हरमनप्रीत कौरने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही कमाल केली. तिने ४ ओव्हरमध्ये २७ धावा देत एक विकेट मिळवली. मंधानाच्या संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी १३ धावांची आवश्यकता होती. मेलबर्नच्या संघाने हरमनप्रीतवर विश्वास ठेवला आणि तिने तो विश्वास सार्थ ठरवला. शेवटच्या ओव्हरमध्ये तिने केवळ ५५ धावा दिल्या. धमाकेदार शतकी खेळीसाठी मंधानाला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. 

आठ भारतीय आहेत या लीगचा भाग

या लीगमध्ये आठ भारतीय खेळाडू भाग घेत आहेत. राधा यादव(सिडनी सिक्सर्स), हरमनप्रीत कौर(मेलबर्न रेनेगेड्स), दीप्ती शर्मा(सिडनी थंडर्स), स्मृती मंधाना(सिडनी थंडर्स), शेफाली वर्मा(सिडनी सिक्सर्स), जेमिमा रोड्रिग्ज(मेलबर्न रेनेगेड्स) ऋचा घोष(होबार्ट हेरिकन्स) आणि पूनम यादव(ब्रिस्बेन हीट) आणि इतरांचा समावेश आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी