शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर, सोशल मीडियावर या खेळाडूला बोलवण्याची जोरदार बॅटिंग

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 11, 2019 | 18:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC World Cup 2019: शिखर धवन वर्ल्ड कप संघातून ३ आठवड्यासाठी बाहेर गेल्यानंतर आता सोशल मीडियावर मोठा वाद सुरू झाला आहे. फॅन्स या खेळाडूला भारतातून बोलवण्याची मागणी करत आहे. 

shikhar dhawan
शिखर धवन 

नवी दिल्ली :  ऑस्ट्रेलिया विरूद्ध धडाकेबाज शतक लगावणारा शिखर धवन हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीनंतर वर्ल्ड कपमधून २१ दिवसांसाठी बाहेर गेला आहे. धवन बाहेर गेल्यामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड कपच्या अभियानाला मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या सामन्यानंतर भारतासाठी परिस्थिती चांगली वाटत होती. पण आता शिखरच्या दुखापतीमुळे परिस्थिती बदली आहेे. आता टीम मॅनेजमेंट समोर अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत. यात धवनच्या जागी कोणाला सामील करायचे याबाबत मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. 

दरम्यान, धवन वर्ल्ड कपमधून बाहेर गेल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर लोकांनी शिखर धवनच्या ऐवजी दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल सामना खेळणाऱ्या रिषभ पंतला संघात सामील करण्याची मागणी करत आहे. अनेक मेसेज, मीम्सच्या माध्यमातून ही मागणी केली जात आहे. पंत यासाठी एक प्रबळ दावेदार आहे. पंत हा डावखुरा फलंदाज आहे. तसेच तो सलामीवीराची भूमिकाही निभावू शकतो, असे लोकांचे मत आहे. 

रिषभ पंत संदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. अनेक युजर्सचे असे मत आहेत, की न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यात रोहित शर्मासोबत रिषभ पंत याने सलामीला जावे. तर काही जणांनी मस्करी करत पंतचे मीम्स बनवले आहेत. तर चला पाहू या पंत बाबत सोशल मीडियावर लोक काय म्हणाताहेत. 

शिखर धवन आणि रिषभ पंत दोन्ही चांगले मित्र आहेत. हे दोन्ही खेळाडू दिल्लीसाठी रणजी टीममध्ये एकत्र खेळले आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्समधून यंदाचा आयपीएल सीझन दोन्ही खेळाडू खेळले आहेत.  आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे की सोशल मीडियावर करण्यात येणारी मागणी ही बीसीसीआयकडून मान्य होते की त्याचा इतर काही प्लान आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर, सोशल मीडियावर या खेळाडूला बोलवण्याची जोरदार बॅटिंग Description: ICC World Cup 2019: शिखर धवन वर्ल्ड कप संघातून ३ आठवड्यासाठी बाहेर गेल्यानंतर आता सोशल मीडियावर मोठा वाद सुरू झाला आहे. फॅन्स या खेळाडूला भारतातून बोलवण्याची मागणी करत आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola