मुंबई: भारतात(india) क्रिकेटला(cricket) धर्म मानला जातो. येथे जर एखादा क्रिकेटर मोठी खेळी करत असेल तर त्याला लगेच क्रिकेटरला देव बनवले जाते मात्र एखादा खेळाडू काही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला तर त्याला चाहत्यांच्या रागाची शिकार व्हावे लागते. असेच काहीसे आता टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूसोबत झाले आहे. इंग्लंडविरुद्ध(india vs england) तिसरा टी-२० सामना(t-20 match) हरताच सोशल मीडियाव(social media)र एका चाहत्याने या खेळाडूवर चांगलीच टीका केली आहे. या चाहत्याने या क्रिकेटरबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. social media fans take a dig on dinesh karthik over his performance
अधिक वाचा - उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला तर खासदारांचं बंड होणार थंड
पहिल्या सामन्यात त्याला ११ धावा करता आल्या. तर दुसऱ्या सामन्यात त्याने १७ धावांचे योगदान दिले. तिसऱ्या सामन्यात तो पराभवाचे मोठे कारण ठरला. तिसऱ्या टी-२० सामन्यात दिनेश कार्तिकने केवळ ६ धावा केल्या. एकीकडे सूर्यकुमारने ताबडतोब शतक झळकावले तर दुसरीकडे इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक धावा करण्यासाठी झुंजत होता.
दिनेश कार्तिक फ्लॉप ठरल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर चांगलाच राग काढला जात आहे. एका युझरने लिहिले की २०१८मध्ये कार्तिकचे कसोटी करिअर संपले, २०१९मध्ये तो वनडेतून बाहेर आला. आता २०२२मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसोबत त्याचे करिअर संपले आहे. तर दुसऱ्या युझरने लिहिले की दिनेश कार्तिक आयपीएलमधील आपली दमदार कामगिरी करू शकलेला नाही.
दिनेश कार्तिकने आयपीएल २०२२मध्ये आरसीबीच्या संघाला आपल्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले होते. त्याने आयपीएल २०२२मधील १६ सामन्यांत ३३० धावा केल्या होत्या. तो आरसीबीसाठी सगळ्यात मोठा फिनिशर ठरला होता. मात्र आयपीएलमधील हिरो टीम इंडियामध्ये आल्यानंतर फ्लॉप ठरत आहे. गेल्या पाच डावांमध्ये तो आपल्या बॅटिंगचा जलवा दाखू शकलेला नाही.
अधिक वाचा - भाविकांना (बाबा बर्फानी) भोलेनाथचं दर्शन घेता येणार
भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात १७ धावांनी हरला. मात्र टीम इंडियाने टी-२० मालिका २-१ अशी आपल्या नावे केली. भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी या मालिकेत कमाल दाखवली. सूर्यकुमार यादवने तुफान सेंच्युरी झळकावली. ५५ बॉलमध्ये त्याने ११७ धावांची खेळी केली. मालिकेत भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली.