Sofiane Loukar Death : सामना खेळताना फुटबॉल प्लेअरला आला Heart Attackचा झटका, मैदानातच सोडले प्राण; Video

Football player Sofiane Loukar Death क्रीडा (sports) जगतातून एक दुखद बातमी समोर आली आहे. फुटबॉल (Football Game) खेळाच्या मैदानात (Ground) चालू सामन्यादरम्यान एका 28 वर्षीय फुटबॉल  खेळाडूला (Football player) हृदयविकाराचा (Heart Attack) झटाका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची बातमी हाती आली आहे. ही घटना अल्जीरीया (Algeria) मध्ये घडली आहे.  

Sofiane Loukar Death
सामना खेळताना 28 वर्षीय फुटबॉल खेळाडूचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • 28 वर्षीय फुटबॉल खेळाडूचा फुटबॉलचा सामना खेळताना मृत्यू
  • सामन्याच्या वेळी आला हृदयविकाराचा झटका.
  • अल्जीरियामधील लीग-2 च्या सामन्या दरम्यान ही घटना घडली.

Football player Sofiane Loukar Death :  अल्जीरिया : क्रीडा (sports) जगतातून एक दुखद बातमी समोर आली आहे. फुटबॉल (Football Game) खेळाच्या मैदानात (Ground) चालू सामन्यादरम्यान एका 28 वर्षीय फुटबॉल  खेळाडूला (Football player) हृदयविकाराचा (Heart Attack) झटाका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची बातमी हाती आली आहे. ही घटना अल्जीरीया (Algeria) मध्ये घडली आहे.  

ज्या खेळाडूचं निधन झाले आहे, त्याचे नाव सोफियान लुकर (Sofiane Loukar) असून तो Mouloudia Saida (मौलौदिया सैदा) या क्लबचा कर्णधार होता. सोफियान लुकर याचे वय फक्त 28 वर्ष होते.  देशांतर्गत सेकंड डिव्हिजनच्या सामना चालू होता, या सामन्या दरम्यान आपल्याच संघाच्या गोलकिपरला सोपियानची धडक झाली, त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला त्यात त्याचा मृत्यू  झाला.  दरम्यान अल्जीरिया येथे लीग-2 चे सामने खेळवले जात आहेत. याच लीग दरम्यान Mouloudia Saida (मौलौदिया सैदा) आणि ASM Oran (एएसएम ओरन) या क्लबमध्ये सामना रंगला होता. सोफियान लुकर हा Mouloudia Saida या क्लबकडून सामना खेळत होता. 

ट्रिटमेंटच्या नंतर परत मैदानात उतरला होता लुकर

दरम्यान, ग्रुप-बीच्या या सामन्यातील पहिल्या हाफचा खेळ चालू होता. याच दरम्यान सोफियान लुकरची आणि त्याचा संघाच्या गोलकीपरची धडक झाली. त्यानंतर त्याला लगेच काही झाले नाही. लुकरला मैदानातच उपचार देण्यात आले आणि तो परत सामना खेळू लागला. 

दहा मिनिटानंतर आला हृदयविकाराचा झटका 

उपचारानंतर मैदानात परत उतरल्यानंतर साधरण 10 मिनिटात सोफियान लुकरला चक्कर आली आणि तो खाली पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर दोन्ही संघातील खेळाडूंचं मनोधैर्य खचलं होतं, एक चांगला खेळाडू आपल्यापासून दूर गेल्यामुळे सर्व खेळाडूंना रडू कोसळत होतं. त्यानंतर आयोजकांनी हा सामना रद्द केला. दरम्यान सामना रद्द होईपर्यंत सोफियान यांच्या क्लबने 1-0 अशी आघाडी घेतली होती.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी