मुंबई: भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि महान खेळाडू सौरव गांगुली(sourav ganguly) आज ५०वा वाढदिवस(birthday) साजरा करत आहे. गांगुलीच्या आपल्या जोरावर टीम इंडियाला(team india) अनेक सामने जिंकून दिलेत. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने परदेशातही जिंकणे शिकले. तो टीम इंडियाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. आता आपल्या बर्थडेला सौरव गांगुलीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. sourav ganguly celebrate birthday with dance, video viral
अधिक वाचा - आजच सोडून द्या हे ५ पदार्थ, नाहीतर लग्नाआधी होईल टक्कल
सौरव गांगुली सध्या लंडनमध्ये आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तो आपली २१ वर्षांची मुलगी सना गांगुली आणि पत्नी डोना गांगुली हिच्यासह डान्स करताना दिसतोय. सोबतच त्याचे काही मित्रही यावेळी मस्ती करताना दिसत आहेत. बॅकग्राऊंडमध्ये ओम शांती ओमचे गाणे वाजत आहे. यानंतर थोड्या वेळाने मै तेरा हिरो हे गाणे दिसते. सौरव गांगुली नेहमीच आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो.
Sourav Ganguly Celebrating 50th B'day dancing Midnight with daughter Sana & Wife Dona Ganguly in London.@SGanguly99 #HappyBirthdayDada #BCCI #SouravGanguly #SouravGangulybirthday #birthday #Cricket #Dada pic.twitter.com/DO5sNr3bKy — Vineet Sharma (@Vineetsharma906) July 8, 2022
सौरव गांगुलीने टीम इंडियासाठी कसोटीत १९९६मध्ये पदार्पण केले आणि २०००मध्ये भारताचा कर्णधार बनला. त्याने भारतासाठी ११३ कसोटी सामन्यांत ७२१२ धावा आणि ३११ वनडे सामन्यांत ११३६३ धावा केल्यात. जेव्हा तो क्रीझवर खेळत असे तेव्हा चाहत्यांना भारत जिंकणार अशीच आशा वाटत असे. गांगुली लांब सिक्स मारण्यासाठी ओळखला जात असे.
अधिक वाचा - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या अडचणीत वाढ
सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने पाकिस्तानी दौऱ्यावर वनडे मालिका ३-२ अशी आणि कसोटी मालिका २-१ अशी जिंकली होती. तसेच दादाच्या नेतृत्वात टीम इंडियाने २००३च्या वर्ल्डकपमध्ये फायनलमध्ये स्थान मिळवले होते. मात्र त्यांना फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. गांगुलीच्या नेतृत्वात भारताला युवराज सिंह, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान आणि हरभजन सिंगसारखे खेळाडू मिळाले. सौरव गांगुलीने टीम इंडियाच्या खेळाडूंची अशी फौज तयार केली जी परदेशातही जिंकू शकते.