South Africa Tour: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत दिले हे अपडेट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 01, 2021 | 13:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

बीसीसीआयचा अध्यक्षसौरव गांगुलीने टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याबाबत मोठे अपडेट दिले आहे.

sourav ganguly
South Africa: गांगुलीने द.आफ्रिका दौऱ्याबाबत दिले हे अपडेट 
थोडं पण कामाचं
 • कोविड १९चा नवा व्हायरस समोर आल्यानंतर साऱ्यांचीच चिंता वाढली आहे.
 • भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना मुंबईत तीन डिसेंबरपासून खेळवला जात आे
 • यानंतर संघ तेथून आठ अथवा नऊ डिसेंबरला चार्टर्ड विमानाने जोहान्सबर्गला रवाना होणार आहे.

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा(BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने(sourav ganguly) मंगळवारी टीम इंडियाच्या(team india south africa tour) दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत काही अपडेट(update) दिले. गांगुलीने मंगळवारी सांगितले की सध्यातरी दक्षिण आफ्रिकेचा दौरा नियोजित कार्यक्रमानुसार होईल आणि कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या परिस्थितीवर सध्या तरी ते लक्ष ठेवून आहे. कोविड १९चा नवा व्हायरस समोर आल्यानंतर साऱ्यांचीच चिंता वाढली आहे. या नव्या व्हेरिएंटचे नाव आहे ओमिक्रॉन. याआधी हे प्रकरण दक्षिण आफ्रिकेत समोर आले होते. गांगुलीने येथील एका कार्यक्रमात सांगितले की सध्या तरी दौरा नियोजित वेळेनुसारच होईल. आमच्याकडे निर्णय घेण्यासाठी आताही वेळ आहे. पहिली कसोटी १७ डिसेंबरला होणार आहे. आम्ही यावर विचार करू. Sourav ganguly gives update about team India south Africa tour

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईत तीन डिसेंबरपासून खेळवला जात आे. यानंतर संघ तेथून आठ अथवा नऊ डिसेंबरला चार्टर्ड विमानाने जोहान्सबर्गला रवाना होणार आहे. गांगुलीने पुढे म्हटले, खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा नेहमीच बीसीसीआयची पहिली प्राथमिकता असेल. आगामी दिवसांत काय घडते ते पाहू. 

भारताचा माजी कर्णधार गांगुलीने खराब फॉर्मशी लढणाऱ्या ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचे समर्थन करताना म्हटले की तो पूर्ण फिटनेस मिळवल्यानंतर संघात आपली जागा पुन्हा घेऊ शकतो. तो एक चांगला क्रिकेटर आहे. तो फिट नाही याच कारणामुळे तो संघात नाही. तो युवा खेळाडू आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर तो चांगले पुनरागमन करेल अशी आशा आहे. 

असा आहे भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

 1. पहिली कसोटी: १७-२१ डिसेंबर: वांडरर्स, जोहान्सबर्ग
 2. दुसरी कसोटी: २६-३० डिसेंबर: सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
 3. तिसरी कसोटी: ३-७ जानेवारी: न्यूलँड्स, केपटाऊन
 4. पहिली वनडे: ११ जानेवारी: बोलंड पार्क, पार्ल
 5. दुसरी वनडे: १४ जानेवारी: न्यूलँड्स, केपटाऊन
 6. तिसरी वनडे: १६ जानेवारी: न्यूलँड्स, केपटाऊन
 7. पहिला T20: १९ जानेवारी: न्यूलँड्स, केपटाऊन
 8. दुसरा T20: २१ जानेवारी: न्यूलँड्स, केपटाऊन
 9. तिसरा T20: २३ जानेवारी: बोलंड पार्क, पार्ल
 10. चौथा टी20: २६ जानेवारी: बोलंड पार्क, पार्ल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी