Sourav Ganguly in ICC : सौरव गांगुलीला ICC मध्ये मिळाले मोठे पद, आता जागतिक क्रिकेटमध्ये मानाचे स्थान

Sourav Ganguly appointment in ICC : सौरव गांगुलीने (Sourav Ganguly)113 कसोटी सामन्यांमध्ये 42.17 च्या सरासरीने 7212 धावा केल्या ज्यात 16 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 41.02 च्या सरासरीने 11363 धावा केल्या ज्यात 22 शतके आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे. गांगुलीने संघाला अशा टप्प्यावर नेले की ज्याला केवळ देशातच नाही तर देशाबाहेरही कसे जिंकायचे हे माहित होते.

sourav ganguly icc board appoints ganguly as chairman of mens cricket committee
सौरव गांगुलीला ICC मध्ये मिळाले मोठे पद 
थोडं पण कामाचं
  • गांगुलीला मिळाले मोठे पद 
  • दादाचे रेकॉर्ड छान 
  • जागतिक क्रिकेटमध्ये दादाला मिळाले मानाचे स्थान

Sourav Ganguly । दुबई : बीसीसीआयचे (BCCI)अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly)यांना आयसीसीमध्ये (ICC)मोठे पद मिळाले आहे. सौरव गांगुलीची ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसीने बुधवारी ही माहिती दिली. गांगुली त्याचा सहकारी माजी भारतीय लेग-स्पिनर अनिल कुंबळेची जागा घेईल, ज्याने प्रत्येकी तीन- तीन वर्षांच्या कमाल कालावधीसाठी जबाबदारी स्वीकारल्यानंतर  आता पायउतार झाला. आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) अध्यक्ष ग्रेग बार्कले म्हणाले, 'आयसीसी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरवचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. (sourav ganguly icc board appoints ganguly as chairman of mens cricket committee)

गांगुलीला मोठे पद मिळाले

ग्रेग बार्कले म्हणाले, 'जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि नंतर प्रशासक म्हणून त्यांचा अनुभव आम्हाला भविष्यातील क्रिकेट निर्णय घेण्यास मदत करेल.' ग्रेग बार्कले म्हणाले, 'मी अनिल कुंबळेचे गेल्या 9 वर्षांसाठी आभार मानतो. त्याची उत्कृष्ट नेतृत्व क्षमता, ज्यामध्ये नियमितपणे आणि सातत्याने डीआरएस वापरून आंतरराष्ट्रीय सामने सुधारणे आणि संशयास्पद गोलंदाजी कृतींना सामोरे जाण्यासाठी मजबूत कार्यपद्धतीचा अवलंब करणे समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे, महिला क्रिकेटसाठी प्रथम श्रेणी दर्जा आणि लिस्ट ए पात्रता लागू केली जाईल. ICC महिला समिती पुढे ICC महिला क्रिकेट समिती म्हणून ओळखली जाईल. क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव्ह यांची आयसीसी महिला समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

दादा  आहे रेकॉर्ड छान


स्टायलिश डावखुरा फलंदाज सौरव गांगुलीने 113 कसोटी सामन्यांमध्ये 42.17 च्या सरासरीने 7212 धावा केल्या ज्यात 16 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 41.02 च्या सरासरीने 11363 धावा केल्या ज्यात 22 शतके आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे. गांगुलीने संघाला अशा टप्प्यावर नेले की ज्याला केवळ देशातच नाही तर देशाबाहेरही कसे जिंकायचे हे माहित होते.

गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 1983 नंतर 2003 मध्ये विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2001 (श्रीलंका) आणि 2003 विश्वचषक (दक्षिण आफ्रिका) च्या अंतिम फेरीत पोहोचला. याशिवाय 2002 मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध नेट वेस्ट मालिका जिंकली होती, त्यानंतर त्याने लॉर्ड्सच्या बाल्कनीत शर्ट काढला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी