Rohit Sharma Captaincy: मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (sourav ganguly) भारताचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) तुलना इतरांशी करणे टाळले असून प्रत्येक कर्णधाराचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि संघाचे नेतृत्व करण्याची त्याची स्वतःची पद्धत असते. असे स्पष्टपणे म्हटले आहे. (sourav ganguly made a big statement about rohit sharmas captaincy)
माजी कर्णधार म्हणाला की, 'रोहित शर्मामध्ये इतर कर्णधारांपेक्षा काही वेगळे नेतृत्व गुण आहेत. कर्णधार म्हणून रोहितची वृत्ती शांत आणि संयमी आहे आणि त्याला चांगला निकाल देण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे.'
'रोहित शर्मा थोडा शांत स्वभावाचा आहे. त्याला गोष्टी अतिशय शांत आणि व्यवस्थितपणे करायच्या आहेत. तो नेहमी घाईत नसतो, तो गोष्टी अत्यंत सावधपणे घेतो.'
अधिक वाचा: IND vs ZIM: गोलंदाजांची कमाल, टीम इंडियासमोर सोपे आव्हान
'महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद चोखपणे हाताळले, त्यानंतर विराट कोहली आला, ज्याचा रेकॉर्ड मोठा आहे. तो वेगळ्या प्रकारचा कर्णधार होता, त्याने गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या. प्रत्येकजण वेगळा असतो, मी कर्णधारांशी तुलना करत नाही, प्रत्येकाची नेतृत्व करण्याची स्वतःची पद्धत असते.' असंही यावेळी सौरभ गांगुल म्हणाला. त्यामुळे सौरभने एक प्रकारे रोहित शर्माची पाठराखणच केली आहे.
व्यस्त क्रिकेट वेळापत्रकामुळे, रोहितने त्रिनिदादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व केले नाही. इथे भारताने 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. रोहितच्या अनुपस्थितीत, डावखुरा सलामीवीर शिखर धवन नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्यासाठी पुढे आला आणि उत्कृष्ट कामगिरी केली.
दरम्यान, अद्यापही गांगुली रोहितवर प्रभावित आहे. त्यामुळेच सौरभ म्हणाला की, रोहितला एमएस धोनी आणि कोहली यांच्यासारख्यांशी तुलना करण्यासाठी थोडा वेळ द्यावा.
अधिक वाचा: Yuzvendra chahal: धनश्रीने नावाच्या मागून हटवले चहल आडनाव, आता नवीन आयुष्य सुरू...
फिफाच्या भारतीय फुटबॉलवरील बंदीबाबत विचारले असता गांगुली म्हणाला, 'मी फुटबॉल खेळत नाही त्यामुळे मी त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही. पण मला वाटते की प्रत्येक क्रीडा संस्थेची एक प्रणाली असते, प्रत्येक क्रीडा संस्थेचे काही नियम असतात. आमच्याकडे आमच्या स्वतःचे नियम आणि कायदे आहेत. बीसीसीआयमध्येही आमचे नियम आणि प्रोटोकॉल आहेत.' असं सौरभ यावेळी म्हणाला.