वाढत्या कोरोनामध्ये आयपीएल होणार की नाही, गांंगुलीचे विधान

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 05, 2021 | 12:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2021 बाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने इंडियन प्रीमीयर लीग म्हणजेच आयपीएलच्या १४व्या हंगामाबाबत म्हटले की आयपीएल २०२१चा हंगाम ठरवलेल्या कार्यक्रमानुसार पार पडेल.

sourav ganguly
वाढत्या कोरोनामध्ये आयपीएल होणार की नाही, गांंगुलीचे विधान 

थोडं पण कामाचं

  • भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचे आयपीएल २०२१बाबत मोठे विधान
  • आयपीएल २०२१ चा हंगाम ठरवलेल्या कार्यक्रमानुसारच होईल
  • मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये १० ते २५ एप्रिलदरम्यान या हंगामातील १० आयपीएलचे सामने रंगणार आहेत.

मुंबई:  भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)(BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने(sourav ganguly) रविवारी सांगितले की आगामी इंडियन प्रीमीयर लीग(IPL 2021)चा हंगाम ठरवलेल्या कार्यक्रमानुसार पार पडेल. राज्य सरकारने या आठवड्याच्या अखेरीस लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर गांगुलीने हे विधान केले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारन वीकेंडला लॉकडाऊन आणि दररोज नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. 

भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला की, सगळं काही ठरवलेल्या कार्यक्रमानुसार पार पडेल. राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की, महाराष्ट्रात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल. दरम्यान, ट्रेन, बस आणि टॅक्सीसह गरजेच्या वस्तूंची ने-आण करण्यासाठी लागणारी वाहतूक सुरू राहणार आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

वानखेडे स्टेडियमवर मॅच

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये १० ते २५ एप्रिलदरम्यान या हंगामातील १० आयपीएलचे सामने रंगणार आहेत. मुंबईच्या ऐतिहासिक स्टेडियममध्ये पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे. चार फ्रेंचायजी - दिल्ली कॅपिटल, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी आपला आधार मुंबईत स्थापित केला आहे. पाचवी फ्रेंचायझी कोलकाता नाईट रायडर्स सध्या मुंबईतच आहे. मात्र ते लवकरच ११ एप्रिलला होणाऱ्या सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी चेन्नईच्या दिशेने मार्गक्रमण करतील. 

खेळाडूंचे लसीकरण

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, बीसीसीआय आयपीएलच्या आधी खेळाडूंचे लसीकरण करण्याबाबत विचार करत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, बोर्ड खेळाडूंचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाशी संपर्क साधेल. ते पुढे म्हणाले, या कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी मला वाटते की लसीकरण हाच एकमात्र पर्याय आहे. बीसीसीआय याबाबत सर्व पर्यायांवर विचार करत आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा अक्षर पटेल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल या दोन खेळाडूंना कोरोना झाला. तसेच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काम करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. दोन क्रिकेटपटू आणि वानखेडे स्टेडियमचे आठ कर्मचारी यांना कोरोना झाल्यामुळे स्पर्धा सुरू होण्याआधीच आयपीएलचे आयोजन कसे होणार, अशी चर्चा केली जात होती. दरम्यान, गांगुलीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी