Virat kohli : सौरव गांगुलीचे मौन विराट कोहलीच्या करिअरसाठी धोक्याचे संकेत?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 17, 2021 | 15:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

sourav ganguly silent on virat kohli; बीसीसीआय हे प्रकरण निपटवण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत आहे. ते हे ही सुनिश्चित करेल ककी मैदानाबाहेरील नाटकीय घटनाक्रमांचा परिणाम महत्त्वाच्या टेस्ट सीरिजवर होणार नाही.

virat kohli
गांगुलीचे मौन विराट कोहलीच्या करिअरसाठी धोक्याचे संकेत? 
थोडं पण कामाचं
  • भारतीय केटच्या इक्रितिहासात फार कमी वेळा हे पाहायला मिळतं की संघाचा कर्णधार आणि अध्यक्ष यांच्यात वाद व्हावा.
  • असं समजतय की बुधवारी जे झाले त्यावरून बीसीसीआयमध्ये कोणीही खुश नाही
  • हळू हळू कोहली भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नजरेतून उतरत गेला

मुंबई: असं म्हणतात की पाण्यात राहून मगरीशी वैर करू नये. विराट कोहलीने(virat kohli) कदाचित असेच काहीसे केले आहे. कधीही कोणत्याही खेळाडूला संघातून आत बाहेर करत असे. हा कर्णधाराचा विशेषाधिकार आहे असं मानूया. मात्र यानंतरच्या गोष्टींचे काय. रोहितशी आलबेल नाही, अश्विन-रहाणे-पुजाराशी कोल्डवार हे ही ठीक होते. मात्र त्यानंतर आयपीएल २०२१च्या भारत टप्प्यात कोरोना केसनंतर सामना खेळण्यास नकार देणे. त्यानंतर आयसीसीच्या एकाही स्पर्धेत यश न मिळणे त्याच्या समस्या वाढवतच गेल्या. हळू हळू कोहली भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नजरेतून उतरत गेला. sourav ganguly silent on virat kohli career

गांगुलीचे मौन

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात फार कमी वेळा हे पाहायला मिळतं की संघाचा कर्णधार आणि अध्यक्ष यांच्यात वाद व्हावा. कोलकातामध्ये बोर्डाचे अध्यक्ष गांगुलीने स्पष्ट केले की तो काही सार्वजनिक विधान करणार नाही. गांगुलीने मीडियाला सांगितले. कोणतेही विधान नाही. कोणतीही प्रेस कॉन्फरन्स नाही. आम्ही हे सावरून घेऊ.  हे बीसीसीआयवर सोडून द्या.

बोर्डातील कोणीही विराटवर खुश नाही

असं समजतय की बुधवारी जे झाले त्यावरून बीसीसीआयमध्ये कोणीही खुश नाही. मात्र त्यांना माहीत आहे तातडीने पर्याय शोधण्यासाठी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे नुकसानदायक ठरू शकते. 

कोहलीमुळे मंडळाला कोट्यावधींचे नुकसान

मीडिया रिपोर्ट्सनुसार २०२१मध्ये खेळवण्यात आलेली आयपीएलची स्पर्धा केवळ आणि केवळ विराट कोहलीमुले यूएईमध्ये शिफ्ट करण्यात आली. यामुळे बोर्डाला कोट्यावधींचा अतिरिक्त खर्च उचलावा लागला. त्यानंतर वर्ल्ड टी-२०चे यजमानपदही यूएईमध्ये करावे लागले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भारतात आयपीएलची स्पर्धा सुरू होती. बायो बबल असतानाही कोरोनाच्या केसेस वाढत होत्या. केकेआर-आरसीबी सामन्याआधी कोलकाताचे दोन खेळाडू पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर विराटने सामनाच खेळण्यास नकार दिला.

विराटच्या निर्णयाने गांगुलीला धक्का

विराटने दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशी काही विधाने केली, ज्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला धक्का बसला. दादांनी गुरुवारी जाहीर निवेदनात म्हटले आहे की, या वादांवर मला बोलायचे नाही आणि बीसीसीआय हे प्रकरण हाताळेल. पण एका मुलाखतीत त्याने रोहितला कर्णधार बनवण्याबाबत खुलासा केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी