sourav ganguly:सौरव गांगुलीचा मोठा निर्णय, अचानक राजीनामा देऊन केले साऱ्यांना हैराण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 28, 2021 | 13:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sourav ganguly took big decision; एटीके मोहन बागान एफसीचे स्वामित्व  RPSG व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडकडे आहेत. ज्यांनी सोमवार लखनऊमध्ये ७,०९० कोटी रूपयांच्या रेकॉर्ड बोलीसह नव्या आयपीएल टीमचे अधिकार जिंकले आहेत. 

sourav ganguly
sourav ganguly:गांगुलीचा मोठा निर्णय, अचानक दिला राजीनामा 
थोडं पण कामाचं
  • गांगुलीने आपल्या पदाचा दिला राजीनामा
  • वादापासून बचावासाठी त्याने घेतला हा निर्णय
  • ललित मोदीने लावले होते मोठे आरोप

मुंबई: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने(bcci president sourav ganguly) बुधवारी एक मोठा निर्णय घेतला. सौरव गांगुलीने वादापासून बचाव व्हावा यासाठी आपल्या एका मोठ्या पदावरून राजीनामा दिला आहे. सौरव गांगुलीने इंडियन सुपर लीगच्या(indian super league) क्लब एटीके(club atk) मोहन बागानच्यानिर्देशक पदावरून राजीनामा दिला आहे. एटीके मोहन बागान एफसीचे स्वामित्व RPSG व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे. यांनी सोमवारी लखनऊमध्ये(lucknow) ७,०९० कोटी रूपयांच्या रेकॉर्ड बोलीसह नव्या आयपीएल संघाचे अधिकार जिंकले. गांगुलीचे हे पाऊल अनेक वादापासून बचावासाठी असल्याचे मानले जात आहे. कारण RPSG ग्रुप आता आयपीएलच्या शर्यतीत सामील झाला आहे. sourav ganguly take big decision,gives resignation

गांगुलीने आपल्या पदाचा राजीनामा दिला

गांगुलीने बुधवारी क्रिकबझला सांगितले, मी राजीनामा दिला आहे. एटीके मोहन बागान एफसीच्या वेबसाईटनुसार निर्देशक मंडळाचे अध्यक्ष म्हणजून संजीव गोएंकासह गांगुलीच्या नावाचा उल्लेख निर्देशकाच्या रूपात केला जात होता. 

वादापासून बचावासाठी घेतला निर्णय

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदीला बीसीसीआयकडून युनायटेड किंग्डममध्ये एका सट्टेबाजी कंपनी गुंतवणुकीसहित सीव्हीसी कॅपिटल्सच्या खेळ संपत्तीवर पूर्ण तऱ्हेने तपास न केल्याने झटका बसला. मी हैराण आहे की बीसीसीआयने आपला होमवर्क केला नाही आणि हा तपासही केला नाही की बोली लावणाऱ्यामध्ये एक सट्टेबाजी कंपनीचा मालक आहे. सीव्हीसी कॅपिटल्स जाहीरपणे स्काय बेटिंगचे ८० टक्के मालक आहेत. अशा प्रकरणांमध्ये कोणी भ्रष्टाचार विरोधी कसे नियंत्रित करतात?

ललित मोदींनी केले होते आरोप

ललित मोदींनी सांगितले की जर टीमचे मालकही एक सट्टेबाजी कंपनीचे मालक आहे तर हे भारतात सट्टेबाजी प्रमोटर्सना सट्टेबाजी न करण्याच्या उद्देशाला हरवतात. मी हैराण आहे की बीसीसीआयने असे होऊ दिले. त्याने मालकांना अयोग्य म्हणून घोषित करायला हवे होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी