सौरव गांगुली असणार कॅप्टन, भारतीय संघाची झाली घोषणा,

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 12, 2022 | 17:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sourav ganguly team captain: रिपोर्टनुसार लीजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामात भारताची संघ टीम इंडिया महाराजाचा सामना रेस्ट ऑफ द वर्ल्ड टीमशी होणार आहे. 

sourav ganguly
सौरव गांगुली असणार कॅप्टन, भारतीय संघाची झाली घोषणा 
थोडं पण कामाचं
  • भारत आणि वर्ल्ड यांच्यातील हा विशेष सामना इंडिया महाराजा वि वर्ल्ड जायंट्स टीमच्या नावाने खेळवला जाईल. या
  • या सामन्यात १० परदेशी देशांतील खेळाडू भाग घेतील.
  • १६ सप्टेंबरनंतर पुढील दिवशी लीजेंड्स क्रिकेट लीगच्या दुसऱ्या हंगामाची सुरूवात होईल.

मुंबई: सौरव गांगुलीने(sourav ganguly) भारतीय संघाचे कर्णधारपद सोडून तसेच क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अनेक वर्षे झाली आहेत. मात्र स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्त खेळल्या जाणाऱ्या एका विशेष सामन्यात तो पुन्हा भारताचे नेतृत्व(lead) करताना तसेच आपली बॅट फिरवताना दिसणार आहे. लीजेंड्स लीग क्रिकेटच्या(legends cricket league) दुसऱ्या हंगामात भारताचा संघ टीम इंडिया महाराजाचा सामना रेस्ट ऑफ द वर्ल्ड टीमशी होणार आहे. हा सामना १६ सप्टेंबरला इडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. sourav ganguly will lead team india maharajas

अधिक वाचा - राजू श्रीवास्तव ४६ तास उलटले तरी बेशुद्ध, प्रकृती गंभीर

भारत आणि वर्ल्ड यांच्यातील हा विशेष सामना इंडिया महाराजा वि वर्ल्ड जायंट्स टीमच्या नावाने खेळवला जाईल. या सामन्यात १० परदेशी देशांतील खेळाडू भाग घेतील. १६ सप्टेंबरनंतर पुढील दिवशी लीजेंड्स क्रिकेट लीगच्या दुसऱ्या हंगामाची सुरूवात होईल. येथे चार संघ भाग घेतील. या हंगामात एकूण १५ सामने खेळवले जातील. लीजेंड्स क्रिकेचटी लीगचा दुसरा हंगामा १७ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर भारताच्या सहा शहरात खेळवला जाणार आहे. 

लीजेंड्स लीग क्रिकेट लीगचे कमिश्नर रवी शास्त्रीने म्हटले, हा माझ्यासाठी गर्वाचा क्षण आहे. आपण सगळेच स्वातंत्र्याची ७५वी साजरी करत आहोत. एक गौरन्वित भारतीय होण्याच्या नात्याने मला हे सांगताना आनंद होतोय की आम्ही या वर्षीची लीग स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षाचा उत्सव साजरा करत आहोत. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात इंडिया महाराजा आणि इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड जायंट्स यांच्यात सामना रंगणार आहे. 

१६ सप्टेंबरला इडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्यासाठी इंडिया महाराजास आणि वर्ल्ड जायंट्सचे संघ

इंडिया महाराजास - सौरव गांगुली (कर्णधार), वीरेंद्र सहवाग, मोहम्‍मद कैफ, यूसुफ पठान, एस बद्रीनाथ, इरफान पठान, पार्थिव पटेल (विकेटकीपर), स्‍टुअर्ट बिन्‍नी, एस श्रीसंत, हरभजन सिंह, नमन ओझा, अशोक डिंडा, प्रज्ञान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंह, जोगिंदर शर्मा आणि रीतेंदर सिंह सोढ़ी. 

अधिक वाचा - शिंदे गट करुन दाखवणार अन् दादरमध्ये प्रति सेना भवन उभारणार

वर्ल्‍ड जायंट्स - इयोन मोर्गन (कर्णधार), लेंडल सिमंस, हर्शेल गिब्‍स, जॅक्‍स कॅलिस, सनथ जयसूर्या, मैट प्रायर (विकेटकीपर), नाथन मॅकुलम, जाटी रोड्स, मुथया मुरलीधरन, डेल स्‍टेन, हॅमिल्‍टन मसाकाद्जा, मश्रफे मुर्तजा, असगर अफगान, मिचेल जॉनसन, ब्रेट ली, केविन ओ ब्रायन आणि दिनेश रामदीन.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी