Sourav Ganguly : पन्नाशीनंतर राहिलायं का स्टॅमिना ? चौकार-षटकारांसाठी दादा गाळतोय घाम

Sourav Ganguly in Legends Cricket क्रिकेटविश्वातील दादा पुन्हा मैदानात परतत आहेत. भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय बॉस सौरव गांगुलीबद्दल बोलत आहोत. दादांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. डावखुरा फलंदाज गांगुली लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये एक खास क्रिकेट सामना खेळताना दिसणार आहे.

Sourav Ganguly will return to the cricket field at the age of 50, is training hard - PICS
Sourav Ganguly : पन्नाशीनंतर राहिलायं का स्टॅमिना ? चौकार-षटकारांसाठी दादा गाळतोय घाम ।   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानात उरतणार
  • वयाच्या 50 व्या वर्षीनंतर चौकार-षटकारांसाठी घेतोय मेहनत
  • लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये एक खास क्रिकेट सामना खेळताना दिसणार

मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) च्या दुसऱ्या सत्रात तो एका विशेष चॅरिटी सामन्याचा भाग असणार आहे. गांगुलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला आहे. (Sourav Ganguly will return to the cricket field at the age of 50, is training hard - PICS)

अधिक वाचा : CWG 2022 : सांगलीच्या 'बाहुबली'मुळे कॉमनवेल्थमध्ये भारताने उघडले खाते, संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले रौप्यपदक

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली वयाच्या 50 व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात परतण्याचा विचार करत आहे. त्यासाठी त्यांनी कसोशीने सराव सुरू केला आहे. गांगुलीने त्याच्या ट्रेनिंगचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

सौरव गांगुली याने पुष्टी केली की तो लेजेंड्स लीग क्रिकेट (LLC) च्या दुसऱ्या सत्रात एक विशेष चॅरिटी सामना खेळणार आहे. अशा प्रकारे गांगुली पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. या क्रिकेट लीगमध्ये निवृत्त खेळाडू भाग घेतात. दिग्गज सौरव गांगुली यापूर्वी 2015 मध्ये क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसला होता. त्यानंतर क्रिकेट ऑल स्टार्स मालिकेदरम्यान तो सचिन ब्लास्टर्स संघाकडून खेळला. त्यानंतर त्याने 37 चेंडूत 3 चौकार आणि तब्बल 6 षटकारांसह 50 धावा केल्या. 

अधिक वाचा : DK द रिअल फिनिशर, 19 चेंडूत 41 धावांची धडाकेबाज खेळी

1996 मध्ये लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण करणाऱ्या सौरव गांगुलीने पहिल्याच कसोटी सामन्यात 131 धावा केल्या होत्या. नंतर त्याने टीम इंडियाची कमानही हाती घेतली आणि भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये त्याची गणना केली जाते.
गांगुलीने आपल्या नेतृत्व कौशल्याने भारताला क्रिकेटमध्ये मोठ्या उंचीवर नेण्यासाठी कठोर परिश्रम केले. त्याने परदेशात सामने आणि मालिका जिंकून भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या युगाची सुरुवात केली. 2003 विश्वचषक स्पर्धेत उपविजेता राहण्याव्यतिरिक्त त्याने 2002 नॅटवेस्ट ट्रॉफी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला विजय मिळवून दिला. 

अधिक वाचा : Rohit Sharma: टीम इंडियाच्या शानदार कामगिरीनंतरही भडकला रोहित, म्हणाला - 

सौरव गांगुली नोव्हेंबर 2008 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 1992 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गांगुलीने 113 कसोटी सामने आणि 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. कसोटीमध्ये त्याने 16 शतके आणि 35 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 7212 धावा केल्या. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 11363 धावा केल्या ज्यात 22 शतके आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी